कर्जत-जामखेडमधून अपक्ष रोहित पवारांचा अर्ज बाद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित राजेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात होते. अपूर्ण शपथपत्र दिल्याने त्यांचा अर्ज बाद केल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. ते कर्जत तालुक्यातील रहिवासी आहेत. याच मतदारसंघातून भाजपच्या वतीने पालकमंत्री राम शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रोहित राजेंद्र पवार हे निवडणूक लढवित आहेत. अपक्ष अर्ज दाखल करणारे रोहित राजेंद्र पवार यांच्या नावात साधर्म्य असले तरी ते अपक्ष उमेदवार होते.

227 कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघात एकूण 27 नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. त्यापैकी 16 उमेदवारांचे 23 नामनिर्देशन पत्र पात्र झाले असून 4 उमेदवारांचे 4 नामनिर्देशन पत्र अपात्र झालेले आहेत. यापैकी पात्र उमेदवार रामदास शंकर शिंदे – भारतीय जनता पार्टी, रोहित राजेंद्र पवार-राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष, शंकर मधुकर भैलुमे -बहुजन समाज पार्टी, अरुण हौसराव जाधव-वंचित बहुजन आघाडी, अप्पासाहेब नवनाथ पालवे -महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सोमनाथ भागचंद शिंदे-जनहित लोकशाही पार्टी, अशोक सर्जेराव पावणे-अपक्ष, उत्तम फकिरा भोसले-अपक्ष, किसन नामदेव सदाफुले-अपक्ष, गोविंद लक्ष्मण आंबेडकर-अपक्ष, बजरंग मनोहर सरडे-अपक्ष, महारुद्र नरहरी नागरगोजे-अपक्ष, राम रंगनाथ शिंदे-अपक्ष, सुमीत कन्हेय्या पाटील -अपक्ष, शहाजी राजेंद्र काकडे-अपक्ष, ज्ञानदेव नरहरी सुपेकर-अपक्ष हे उमेदवार पात्र असून शेख युनुस दगडू, रोहित राजेंद्र पवार (पिंपळवाडी तालुका पाटोदा), रावसाहेब मारुती खोत, आशाबाई रामदास शिंदे हे चार उमेदवार अपात्र ठरलेले आहेत.

शेख युनूस दगडू व रोहित राजेंद्र पवार हे अपूर्ण शपथपत्र दिल्याने अपात्र झाले असून, रावसाहेब मारुती खोत हे अनामत रक्कम अपुरी असलेने अपात्र झाले तर आशाबाई रामदास शिंदे या भारतीय जनता पार्टी चा पर्यायी उमेदवार म्हणून नमुना ब मध्ये उल्लेख असलेने मात्र मुख्य उमेदवार चा अर्ज पात्र झाल्याने अपक्ष उमेदवार साठी आवश्यक पात्रता पूर्ण केली नसल्याने अपक्ष उमेदवार म्हणून अपात्र झाले आहेत.

visit : Policenama.com