‘गुलाबाचा चहा’ प्या, ‘वजन’ कमी करा, डाएट आणि व्यायामाचे नो झंझट ! ‘हे’ 5 फायदे जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  गुलाबाचे फुल आणि पाने यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. याचा वापर आयुर्वेदामध्ये सुद्धा केला जातो. गुलाबाच्या फुलाचा वापर करून तुम्ही वजनसुद्धा कमी करू शकता. ब्युटी प्रोडक्टमध्ये गुलाबाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी कमीतकमी खर्चात तयार केलेला गुलाबाचा चहा लाभदायक ठरू शकतो.

असा तयार करा चहा

ताज्या गुलाबाच्या पाकळ्या घ्या. 1 ते 2 कप पाणी फुलांमध्ये घालून हे पाणी उकळवा. नंतर कमी आचेवर हे पाणी ठेवा. चहा चांगला तयार झाल्यानंतर पाण्याचा रंग बदलेल मग गॅस बंद करा. नंतर पाणी पुन्हा उकळवा. नंतर हे पाणी गाळून घेऊन त्यामध्ये लिंबू आणि मध घाला. नंतर या चहाचे सेवन करा. दिवसातून 2 ते 3 वेळा हा चहा घेतल्यास लवकर फरक दिसून येतो.

हे आहेत चहाचे फायदे

1 वजन

गुलाबाचा चहा नियमित सेवन केल्यास वजन कमी होते.

2 पचनक्रिया

या चहाने पचनक्रिया सुरळित होते. पोट साफ होते. पोटाचे विकार दूर होतात. मळमळ होणे, सतत ढेकर येणे, डोकेदुखीचा त्रास कमी होतो.

3 टॉक्सीन्स

या चहाच्या सेवनाने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनची समस्या दूर होते.

4 प्रतिकारकशक्ती

रोग प्रतिकारकशक्ती वाढते. गुलाबाच्या सुगंधामुळे झोप चांगली येते.

5 तणाव

तणावमुक्त होण्यासाठी सुद्धा हा गुलाबाचा चहा लाभदायक आहे.