‘आरपीआय’ चा सेनेला पाठिंबा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महायुतीतील भाजप व शिवसेना पक्षाच्या नगर जिल्ह्यातील उमेदवारांचा प्रचार करून आयपीआय युतीचा धर्म पाळणार आहे, अशी माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलेल्या आदेशानुसार आरपीआय पक्ष युतीचा धर्म पाळणार असून नगर जिल्ह्यातील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराचाच प्रचार आम्ही करणार आहोत. पक्षातील काही नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर केली जाईल, असे सुनिल साळवे यांनी या वेळी बोलताना सांगितले. परंतु निवडणूक कोणी लढवायची तो निर्णय पक्षाचे अध्यक्ष आठवले हे घेतात.

त्यामुळे आम्ही नगर जिल्ह्यात युतीचा धर्म पाळणार आहोत, असे ते म्हणाले. यावेळी विनोद भांबळ, भाऊसाहेब साळवे, जितू ठोंबे, शिवाजी साळवे, सचिन साळवे, गायकवाड आदी उपस्थित होते.

Visit : policenama.com

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी