Coronavirus Vaccine : ‘या’ देशात आगामी महिन्यापासून सर्वसामान्यांच्या लसीकरणास होणार सुरूवात

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जगभरात १५,३९५,७६७ जणांना कोरोना संसर्गाची बाधा झाली आहे. तर ६३०,७२० लोकांचा मृत्यू या संसर्गामुळे झाला आहे. अशात लोक लसीची वाट पाहत आहे. लस बनवण्याबाबत भारत, ब्रिटेन, रुस, अमेरिका हे देश सगळ्यात पुढे आहेत. तसेच ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीची जगात खूप चर्चा सुरु आहे. या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात चाचणीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहे. रशियातील सीएचओनेव युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी सांगितली की, आता या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला लवकरच सुरवात होईल. एका रिपोर्टमध्ये ही लस पुढच्या महिन्यात सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होणार असल्याचं सुद्धा म्हटलं आहे.

चीन, ब्रिटन, अमेरिका हे देश लसीच्या बाबतीत पुढे आहेत. पण काही दिवसांपूर्वी रशियाने कोरोना संसर्गाची पहिली लस बनवल्याचा दावा केला होता. रशियाच्या दाव्याने सगळेजण आश्चर्यचकित झाले होते. तसेच रशियावर लसीसंदर्भात माहिती चोरल्याचा सुद्धा आरोप करण्यात आला होता. पण हा आरोप रशियाने नाकारला आहे. रशियाचे आरोग्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियात कोरोना संसर्गाची लस ही लवकरच तयार होणार आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, अंतिम टप्प्यातील मानवी चाचणी अगोदरच कोरोना संसर्गाची ही लस सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अतिरिक्त वैद्यकीय परीक्षण याच कालावधीत केलं जाणार आहे. तर रशियन डायरेक्ट इनवेस्टमेंट फंडचे प्रमुख कार्यकारी अधिकारी किरील दिमित्रीव म्हणाले, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दोन वेगवेगळ्या लसींवर काम सुरु आहे. ३ ऑगस्टपासून सुरु होत असलेल्या लसीच्या चाचणीसाठी हजारो वॉलेंटिअर्सना सहभागी करुन घेतलं जाणार आहे.

रशिया सोबतच सौदी अरेबियातही या लसीची चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी ३ कोटी डोसजे उत्पादन केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच इतर देशांसाठी मिळून १७ कोटी डोज तयार करण्याचा प्रयत्न असेल. रशियातील सेचेनोव युनिव्हर्सिटीने कोरोना संसर्गाची लस सगळ्यात आधी विकसित केल्याचा दावा केला होता. या लसीची निर्मिंती रशियाच्या मिनिस्ट्रीला गमाली इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी एंड माइक्रोबायोलॉजीक ने केली आहे. लसीच्या पहिल्या चाचणीची सुरुवात १८ जूनला झाली होती. तेव्हा १८ स्वयंसेवकांना डोज देण्यात आले होते. तर दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी २० लोकांच्या समूहाला लसीचा डोज देण्यात आला होता.