‘कामा’साठी तिला नेलं मुंबईतून राजस्थानला, सेक्स रॅकेटमध्ये ढकल्याण्याच्या भितीनं केलं ‘शुभमंगल’

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कॅटरिंगचे काम मिळवून देण्याच्या आमिषाने मुंबईतील एका विवाहित महिलेला राजस्थानमधील गावा नेले. याठिकाणी तिला वेश्या व्यवसायात ढकलण्याची भीती घालून तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिच्या सुटकेसाठी आरोपींनी घरच्यांकडे दोन लाख रूपयांची मागणी केली. ही घटना मुंबईत उघडकीस आली असून मुंबई पोलिसांनी या टोळीचा पर्दाफश करत पीडित महिलेची सुटका केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणात विवेक उर्फ विक्की रामानंद जांगीड (वय-22), मुकेशकुमार बद्रीप्रसाद जांगीड (वय-37) कृष्ण कुमार (वय-33) परवीनकुमार जांगीड (वय-33), कविता प्रताप जाधव उर्फ सलमा अकबर भट्टी (वय-35), कुसुम उर्फ रेखा राजू शिंदे उर्फ रेखा दौलत निकम (वय-45) या टोळीला अटक केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.

ADV

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला 2 नोव्हेंबर रोजी आरोपी कुसुमच्या घरी गेली होती. त्यावेळी तिने पीडित महिलेला राजस्थान आणि गुजरातमध्ये कॅटरर्सचे काम मिळवून देते असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. कुटुंबाला हातभार लागेल या उद्देशाने पीडित महिलेने कुसुमचा प्रस्ताव स्विकारला. 5 नोव्हेंबरला कामाच्या पाहणीसाठी पीडितेला गुजरात येथे नेऊन चार दिवस ठेवले. त्यानंतर कुसुम आणि राजूने फिर्य़ादी महिलेला अहमदाबाद येथून एका व्यक्तीसोबत गोडसा येथे पाठवले.

कुसुम, राजू आणि विजय यांनी तिला कविताच्या घरी नेले. त्याठिकाणी तिला दहा दिवस ठेवले. तिथेच प्रविणने तिला तीन ते चार जणांना दाखवले. तसेच ते दाखवतील त्या व्यक्तीसोबत लग्न न केल्यास वेश्या व्यवसायात ढकलण्याची धमकी दिली. तिचे 40 वर्षाच्या मुकेश कुमारसोबत बळजबरीने लग्न लावून दिले. तिने सोडण्याची विनंती केली मात्र, त्याने तिच्यावर अत्याचार करून मारहाण केली.

पैशासाठी पीडितेच्या मुलाला फोन
आरोपींनी 2 डिसेंबर रोजी पीडित महिलेच्या मुलाला फोन करून तुला आई पाहिजे असल्यास दोन लाख रुपये दे अशी मागणी केली. मुलाने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर कुरार पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथाने पीडित महिलेची सुखरुप सुटका करून आरोपींना अटक केली. पुढील तपास कुरार पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/