‘भाईजान’ सलमाननं केली ‘कोरोना’ टेस्ट ! रिपोर्ट येताच सागितलं Bigg Boss ची शुटींग करणार की नाही ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) चा ड्रायव्हर आणि 2 स्टाफला कोरोना (Covid-19) झाला आहे. त्यांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. ही माहिती समोर आल्यानंतर आता सलमान खाननं स्वत:ला आयसोलेट केलं होतं. सलमान खान सध्या खूप व्यस्त आहे. बिग बॉस 14 ला होस्ट करत आहे. अशात सलमान खान आगामी काही एपिसोडमध्ये दिसेल की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नव्हती. याबद्दल बरीच चर्चाही सुरू होती.परंतु आता अशी माहिती आहे की, सलमान आणि त्याच्या फॅमिलीची कोविड टेस्ट निगेटीव्ह आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सलमानच्या ड्रायव्हरचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात येणाऱ्या इतर स्टाफची कोरोना टेस्ट करण्यात आली. यावेळी यातील 2 स्टाफचा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. यानंतर आता सलमान खाननं स्वत:ला आयसोलेट केलं होतं.

सलमानची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे. परंतु दक्षता घेत बीएमसी (BMC) नं त्याचं घर सॅनिटाईज केलं आहे. आधी अशी महिती होती की, सलमान खान एक आठवड्यासाठी आयसोलेट होणार आहे. पंरतु आता अशी माहिती समोर आली आहे की, तो आता बिग बॉसची शुटींग करणार आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभु देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळं ते शक्य झालं नाही. याशिवाय तो अंतिम आणि शाहरुख्या पठाण सिनेमातही दिसणार आहे.

You might also like