अमेरिकेत PM नरेंद्र मोदी चुकीचं बोलले : संभाजी भिडे

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे नेहमी वेगवेगळया कारणामुळे आणि आपल्या वक्‍तव्यांमुळे चर्चेत असतात. आता भिडेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या महासभेतील भाषणातील वक्‍तव्यावर आक्षेप घेतला आहे. एवढयावरच संभाजी भिडे हे थांबले नसून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चुकीचे बोलले असल्याचे देखील म्हंटले आहे.

संभाजी भिडे म्हणाले की, अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चुकीचे बोलले आहेत. झालेली चूक महाराष्ट्र दुरूस्त करूशकतो, ते काम आपले आहे. भारतानं जगाला बुध्द दिला, पण बुध्द काहीच उपयोगाचा नाही. विश्‍वाचा संसार सुखाने चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच पाहिजेत असे देखील संभाजी भिड म्हणाले. संभाजी भिडे हे नवरात्र उत्सवानिमित्‍त काढण्यात आलेल्या सांगलीतील श्री दुर्गामाता दौडीमध्ये सहभागी झाले होते.

दरम्यान, युवकांमध्ये हिंदू धर्माबद्दल जागृती व्हावी म्हणून संभाजी भिडेंनी सन 1982 पासुन सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौड सुरू केली आहे. पंतप्रधान मोदींच्या युनोतील भाषणाची सर्वत्र चर्चा झाली एवढेच नव्हे तर मोदींच्या भाषणादरम्यान युनोमध्ये टाळयांचा कडकडाट देखील झाला. शनिवारी रात्री उशिरा मोदी अमेरिकेतून भारतात परतले. त्यांचे दिल्‍लीच्या पालम विमानतळावर मोठया जल्‍लोषात स्वागत करण्यात आले.

भारताने जगाला युध्द नाही तर बुध्द दिला : PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युनोमध्ये केलेल्या भाषणात पाकिस्तानचं नाव न घेता पाकिस्ताला चांगलच फैलावर घेतले. भारताने जगाला युध्द नाही तर बुध्द दिला असे मोदींनी सांगितलं. भारताने नेहमीच एकजुटीचा आणि शांतीचा संदेश जगता दिला आहे. भाषणादरम्यान मोदींनी महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद आणि कवी कणियन पूंगुन्ड्रनार यांच्या विचारांचा उल्‍लेख केला. भाषणाच्या दरम्यान उपस्थितांनी टाळयांचा कडकडाट केला.

Visit : Policenama.com