मनसे झेंड्यावरून ‘वाद’ उफाळण्याची शक्यता, संभाजी ब्रिगडचा मनसेच्या भाषेत ‘इशारा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्ता समीकरणे बदलल्यानंतर मनसे कोणती भूमिका घेणार यावरून चार्चांना उधाण आले आहे. मनसेने आपल्या झेंड्यात बदल करून झेड्याचा रंग भगवा करून त्यावर राजमुद्रा असणार असल्याची चर्चा आहे. यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. मनसेने छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा राजकारणासाठी वापरू नये अन्यथा आंदोलन करु असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2954984954520211&id=693099604042102

मनसेचा 23 जानेवारी रोजी मुंबईत महाधिवेशन आयोजित करण्यात आला आहे. त्यापूर्वी मनसे हिंदुत्वाच्या दिशेने राजकारण करणार असून शिवसेनेपासून दुरावलेल्या कट्टर हिंदुत्ववादी मतदार खेचण्यासाठी राज ठाकरे आपली रणनीती बदलणार असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या झेंड्यातील निळा आणि हिरवा रंग बदलून संपूर्ण झेंडा भगव्या रंगाचा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
काही वर्षापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवजयंती आणि महाराष्ट्र दिनासाठी भगव्या रंगाच्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले होते. त्यावर शिवरायांची राजमुद्राही प्रकाशित करण्यात आली होती. मनसे कार्यकर्त्यांकडून हा झेंडा शिवजयंतीच्या कार्यक्रमात वापरण्यात येत होता. हाच झेंडा मनसेचा अधिकृत झेंडा म्हणून यापुढे आणणार असल्याची चर्चा आहे. मात्र, यावरुन शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

यावर संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे प्रतीक राजमुद्रा आहे. राजमुद्रा ही महाराजांची प्रशासकीय बाब आहे. त्याचा राजकारणासाठी मनसेसह कोणीही वापर करु नये. मनसेने मतांच्या राजकारणासाठी झेंडा आणला होता. त्यातून यश मिळालं नसल्याने झेंडा बदलणार असल्याचं कळतंय, पण त्यांनी वारकऱ्यांचा, हिंदू धर्माचा झेंडा म्हणून भगवा स्वीकारला तर त्यांचे स्वागत आहे. परंतु त्यावर शिवरायांची राजमुद्रा असू नये असे त्यांनी म्हटलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/