आज लॉन्च होणार सॅमसंग A71

नवी दिल्ली : वृत्त संस्था – दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंग ही आज आपले नवीन मॉडेल A71 बाजारात लॉन्च करणार आहे. हा फोन A सीरिजचा आहे. याआधी कंपनीने सॅमसंग गॅलॅक्सि A51 लॉन्च केला होता. कंपनीने A71 हा फोन नुकताच व्हिएतनाममध्ये लॉन्च केलं होता, या फोनची भारतीय बाजारपेठेतील किमंत साधारणपणे ३० हजार रुपये असू शकेल. या फोनमध्ये अनेक नवीन आणि अपग्रेडेड फीचर्स असून गॅलॅक्सि A70  चा आधुनिक फोन म्हणून याकडे पाहिले जाते. A 71 या फोनची किंमत सुरुवातीला 29 हजार 999 रुपयांपेक्षा कमी असू शकेल.

गॅलॅक्सि A71 ची वैशिष्ट्ये
या फोनचा डिस्प्ले 6.7 इंच असणार आहे. 1080*2400 रेझोल्यूशन पिक्सल असणार आहेत. 6 आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजसह ताकदवान ऑक्ट्रा-कोर स्नॅपड्रॅगन 730 एसओसी प्रोसेसर या फोनला देण्यात आला आहे. या मोबाईलला क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे . 25 वॅटची 4500 एमएच ची फास्ट चार्जिंग असणारी बॅटरी दिलेली आहे. तसेच या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सह 12  मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 5 मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे.