SAMSUNG च्या ‘या’ स्मार्टफोनवर 7,000 रुपयांची सूट, अतिरिक्त ‘डिस्काऊंट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  दक्षिण कोरियाची स्मार्टफोन निर्माता सॅमसंगने आपल्या फ्लिप स्मार्टफोन Galaxy Z Flip ची किंमत कमी केली आहे. हा स्मार्टफोन आता ७,००० रुपये कमी किंमतीत खरेदी करता येऊ शकतो.

Galaxy Z Flip ला भारतात १,१५,९९९ रुपयात लाँच केले होते. आता किंमत कमी झाल्यावर तुम्ही हा स्मार्टफोन १,०८,९९९ रुपयात खरेदी करू शकता. विशेष म्हणजे हा कंपनीचा प्रीमियम सेगमेंट स्मार्टफोन आहे आणि त्यात फोल्डेबल डिस्प्ले दिला गेला आहे.

Galaxy Z Flip वरील या सवलतीशिवाय ग्राहकांना ऍडिशनल सूटही दिली जात आहे. अपग्रेड ऑफर अंतर्गत ग्राहकांना ८,००० रुपयांची सूट मिळेल. Galaxy Z Flip सह १८ महिन्यांसाठी नो कॉस्ट ईएमआयची देखील ऑफर देण्यात येत आहे.

Galaxy Z Flip चे सर्वात मोठे वैशिष्ट्य त्यात लावली गेलेली फोल्डेबल स्क्रीन आहे. कंपनीने यात डायनॅमिक AMOLED Infinty Flex डिस्प्लेचा वापर केला आहे, जो ६.७ इंच आहे आणि हा फुल एचडी डिस्प्ले आहे.

Galaxy Z Flip मध्ये Qualcomm Snapdragon 855 Plus प्रोसेसरसह 8GB रॅम आणि 265GB इंटरनल स्टोरेज दिले गेले आहे. फोनचा सेकेंडरी डिस्प्ले देखील आहे, जो वेळ आणि नोटिफिकेशन पाहण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

या स्मार्टफोनमध्ये १२-१२ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे दिले गेले आहेत आणि याची बॅटरी 3300mAh आहे. हा मिरर गोल्ड, मिरर पर्पल आणि मिरर ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.