वाळू माफियांचा पोलीसावर प्राणघातक हल्ला

रेणापूर : पोलीसनामा आॅनलाईन

पेट्रोलिंग करुन रेणापूरकडे जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर वाळू माफियांनी दर्जी बोरगाव परिसरात प्राणघातक हल्ला केला आहे. ही घटना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली असून याप्रकरणी सोमवारी रेणापूर पोलीस ठाण्यात वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8f05a345-c58a-11e8-9496-110fdc326153′]

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुन्ह्याच्या तपासासाठी तसेच पेट्रोलिंग करुन रेणापूरकडे येणारे रेणापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संतोष गायकवाड यांना वाळू माफियांनी दर्जी बोरगाव शिवारात अडवले. ‘तू आमच्या वाळूच्या गाड्या पकडण्यासाठी तेसच महसुलच्या लोकांना मदत करण्यासाठी आला होतास का’ अशी विचारणा करत गायकवाड यांना जबर मारहाण केली. यावेळी गायकवाड यांच्या आंगावर जीप घालून जिवे मारण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान साधून जीव वाचवण्यासाठी बाजूला उडी घेतली.

[amazon_link asins=’B0716G2QFJ,B07191JTQD’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9fd6997c-c58a-11e8-abc1-a1f1b1773cb8′]

यावेळी दुचाकिवरुन सांगवीकडे जाणाऱ्या दोन तरुणांनी पोलीसाला मारहाण होत असल्याची घटना पाहिली. त्यांनी गायकवाड यांना वाचवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, वाळू माफियांचा जमाव मोठा असल्यामुळे त्या दोघांनी तात्काळ सांगवी गावाकडे धाव घेतली. तेथे ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. ग्रामस्थ घटनास्थळाकडे येत असल्याचे पाहून वाळू माफियांनी तेथून जीपसह पलायन केले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लांजिले, पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

तीन पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

याबाबत पोलीस कर्मचारी संतोष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून राजाभाऊ सूर्यवंशी, रामभाऊ सूर्यवंशी (रा. आरजखेडा) यांच्यासह अन्य साथीदारांविरोधात रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील सर्व आरोपी फरार झाले आहेत. अटकेसाठी रेणापूर पोलीस ठाण्याची दोन पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी दिली आहे.
जाहिरात.