Sanjay Gaikwad | अन् तेथेच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा घात केला, आ. संजय गायकवाड यांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) Shivsena Uddhav Balasaheb Thackeray आणि एकनाथ शिंदे यांचा गट (बाळासाहेबांची शिवसेना) Balasahebanchi Shivsena यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. आता शिंदे यांच्या गटातील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरेंचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही, असे संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) म्हणाले आहेत.

 

भाजप-शिवसेना युती (BJP-Shivsena Alliance) म्हणून निवडणूक लढवली. आणि सत्ता घेण्यासाठी काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीसोबत (NCP) आघाडी केली. याचाच अर्थ असा की आम्ही भाजप (BJP) आणि हिंदुत्वासोबत गद्दारी केली. 1997 पासून हे सर्व षडयंत्र सुरु झाले. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता. शिवसेनेसोबत संबंध होता तो बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा, असा दावा संजय गायकवाड (Sanjay Gaikwad)  यांनी केला आहे.

 

बुलढाणा येथे छत्रपती शिवाजी महाराज मंदीर भूमीपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार संजय गायकवाड बोलत होते. बाळासाहेबांवर बायपासची शस्त्रक्रिया झाली आणि त्यांची पत्नी आणि मोठ्या मुलाचे निधन झाले. अशावेळी बाळासाहेब ठाकरे एकटे पडले. त्यांना दहशतवाद्यांच्या धमक्या येत होत्या. त्यांना मुंबई पोलिसांची (Mumbai Police) झेड प्लस सुरक्षा देण्यात आली. यावेळी त्यांच्या भेटीगाठी कमी झाल्या आणि उद्धव ठाकरे यांना वाटले आपण राज्याचे नेतृत्व करावे, असे गायकवाड म्हणाले.

त्यावेळी निवडणूक आयोगाला कार्याध्यक्ष निवडून द्यायचा होता.
आणि सर्वात मोठी अडचण राज ठाकरे यांची होती. उद्धव ठाकरेंनी यावेळी
मोठा राजकीय डाव टाकला आणि मनोहर जोशींच्या (Manohar Joshi) खांद्यावर बंदूक ठेवली.
उद्धव ठाकरेंनी मनोहर जोशींच्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि राज ठाकरेंना सांगितले,
उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करा, अशी बाळासाहेब ठाकरेंची इच्छा आहे.
कारण राज ठाकरे बाळासाहेबांचा शब्द पाडू शकणार नाहीत, हे त्यांना माहित होते.
तेव्हा उद्धव ठाकरेंचा शिवसेनेशी काहीही संबंध नसताना राज ठाकरेंनी
कार्याध्यक्ष पदासाठी उद्धव ठाकरेंचे नाव सुचवले आणि तेथेच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा घात केला.

 

Web Title :- Sanjay Gaikwad | mla sanjay gaikwad on uddhav thackeray in buldana

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा