संजय पाचंगे यांची पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन – शिरूर येथील समाजिक कार्यकर्ते क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांची पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असुन तसे निवडीचे पत्र त्यांना नुकतेच खासदार गिरीष बापट यांनी दिले आहे. क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी टोल आंदोलनासह सामाजिक विषयांवर अमरण उपोषणांसह अनेक आंदोलने केलेली असुन त्यांचा जिल्ह्यात मोठा जनसंपर्क आहे.

त्यांची पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने भाजपची ताकत वाढणार आहे.भाजप उद्योग आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी पाचंगे यांची निवड झाल्यानंतर विविध स्तरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.

यावेळी पुणे खासदार गिरीष बापट,मावळचे मा.आमदार राज्य मंत्री बाळाभाऊ भेगडे,आमदार राहुल कुल,आमदार भिमराव तापकिर, मा.आमदार शरद ढमाले,पुणे जिल्हा प्रभारी योगेश गोगवले,संघटन मंत्री रविंद्र आनसपुरे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,मा.जिल्हापरिषद अध्यक्ष जलिंदर कामठे,नगरसेवक अमोल बालवडकर,कांचन कुल,पुणे जिल्हा उपाध्यक्ष दादा साहेब सातव,सरपंच सुदर्शन चौधरी तसेच जिल्हातील सर्व पदाधीकारी उपस्थित होते.