Sanjay Raut On BJP | नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांचे एकत्रित प्रयत्न; शिवसेना नेते संजय राऊतांचा खळबळजनक दावा

मुंबई : Sanjay Raut On BJP | शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संदर्भात एक गंभीर आरोप केला आहे. नागपूरमध्ये (Nagpur Lok Sabha) नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या पराभवासाठी मोदी, शाह आणि फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनामधील रोखठोक सदरात राऊत यांनी हा दावा केला आहे.

संजय राऊत यांनी रोखठोक सदरात म्हटले आहे की, ४ जूननंतर भाजपात मोदी-शहांना पाठिंबा राहणार नाही. गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात.

या लेखात पुढे म्हटले आहे की, जे गडकरींचे तेच योगींचे. अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे योगी को बचाना है, तो मोदी को जाना है हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. उत्तर प्रदेशात भाजपला ३० जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी-शहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचाही परिणाम ४ जूनला दिसेल.

संजय राऊत यांनी या लेखात म्हटले आहे की, महाराष्ट्राने मोदी शहांच्या झुंडशाहीशी झुंज दिली.
त्यामुळे उद्याच्या दिल्लीतील परिवर्तनात महाराष्ट्राचे नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल.
दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले, ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील.
एकनाथ शिंदे यांनी पैशाचा अफाट वापर या निवडणुकीत केला.
प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान २५ ते ३० कोटी रुपये वाटले. पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळे बजेट.

या लेखात मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आरोप करताना राऊत यांनी लिहिले आहे
की, अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले.
महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीने अनेकांचे डोळे दिपले.
विचारांवर चालणारा महाराष्ट्र निवडणूक पैशांच्या धुरळ्यावर चालला.
लोकांनी पैसे घेतले भ्रष्टाचारातून निर्माण झालेले सरकारने शेवटी जनतेला भ्रष्ट केले, असे लेखात राऊत यांनी म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PCMC News | मंगळसूत्र विकून, सोने गहाण ठेऊन पूर रेषेतील बांधकामांसाठी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा आरोप

Ravindra Dhangekar On Ajit Pawar | पोर्शे कार अपघातावरून धंगेकरांचा अजितदादांवर निशाणा,
”त्यांची भाषा सैल झालीय, फडणवीसांनी हातपाय बांधून खुर्चीत ठेवलंय” (Video)

Porsche Car Accident Pune | सुरेंद्रकुमार अग्रवालने ड्रायव्हरला खोलीत डांबले; ड्रायव्हरच्या बायकोने आरडाओरडा केल्यानंतर सुटका (Videos)