Sanjay Raut | भाजपाचे लोक काय जंगलात राहतात का? त्यांच्या सर्व मालमत्ता काय वैध आहेत का? – संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सक्तवसुली संचालनालयानं (ED) केलेली अटक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे टाकलेले छापे (Income Tax Raids) यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर हल्लाबोल केला. अनिल देशमुख हे स्वतःहुन ईडीसमोर हजर झाले आहेत. केंद्रीय सत्तेच्या पाठबळावर लोक देश सोडून पळून जातात. देशमुखांना झालेली अटक ही कायद्याला आणि नीतीमत्तेला धरुन नाही तर अजित पवारांच्याही मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे पडले आहेत. पण मला एक कळत नाही. भाजपाचे लोक काय जंगलात राहतात का? त्यांच्या सर्व मालमत्ता काय वैध आहेत का? ईडी, इन्कम टॅक्स वाल्यांना फक्त महाविकास आघाडीचेच नेते कसे काय दिसतायत अशा शब्दात त्यांनी (Sanjay Raut) भाजपवर निशाणा साधला.

मुंबईतील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, केंद्रीय सत्तेच्या मदतीनं मोठे घोटाळे आणि आरोप असलेले व्यक्ती देश सोडून पळून जातात. परमबीर सिंग हे काही स्वत: पळून गेलेले नाहीत. त्यांना पळवून लावण्यात केंद्रीय सत्तेनं मदत केली आहे, असा आरोप त्यांनी केला. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांवर चिखलफेक करण्याचा धंदा यांनी सुरु केला आहे. बदनामी करायची आणि डाव साधायचा असं घाणेरडे राजकारण भाजपकडून सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

भाजपाचे लोक काय जंगलात राहतात का?

अनिल देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई झाली. त्या पाठोपाठ अजित पवार यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे पडले.
पण मला एक कळत नाही की भाजपाचे लोक काय जंगलात राहतात का? त्यांच्या सर्व मालमत्ता काय वैध आहेत का? त्यांनी काय सगळे टॅक्स भरलेत का?
ईडी, इन्कम टॅक्स वाल्यांना फक्त महाविकास आघाडीचेच नेते कसे काय दिसतायत यामागचं खरं कारण सर्वांना माहित आहे.
त्यामुळे मला काही जास्त बोलायला लावू नका. दिवाळीनंतर काही लोक बॉम्ब फोडू असं म्हणत आहेत.
पण मी एकच सांगतो दिवाळीनंतर जर आम्ही बॉम्ब फोडायचं ठरवलं तर यांना घरातच काय तर बाथरूममध्ये तोंड लपवावं लागेल.
पण आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत त्यामुळे तसं आम्ही करणार नाही, असेही राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

 

Web Title :- Sanjay Raut | sanjay raut attacks bjp over income tax raid ajit pawar property and anil deshmukh arrest by ed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sameer Wankhede | महागडे कपडे आणि घड्याळांच्या आरोपावरुन समीर वानखेडेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…

Sanjay Raut | ‘बॉम्ब फोडले तर भाजपाचे लोक बाथरुममध्ये तोंड लपवतील असे गौप्यस्फोट करु’ – संजय राऊत

Nawab Malik | नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट ! म्हणाले – ‘समीर वानखेडे PM मोदींहून पुढे गेले; 1 लाखाची पँट, 70 हजारांचा शर्ट, अन्…’