भाजपाची शिवसेनेवर खरमरीत टीका, म्हणाले – ‘नेलकटरला घाबरणारे संजय राऊत तलावारीची भाषा करतात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या स्मृतिस्थळावर जात त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही ( Uddhav Thackery) शिवतीर्थावर जाऊन दर्शन घेतले. तसेच, शिवाजी पार्क येथून खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनीही बाळासाहेबांच्या आठवणी जागवताना भाजपवर ( BJP) टीका केली. तसेच, हिंदुत्वासाठी कुणाच्या प्रमाणपत्राची गरज आम्हाला नसल्याचंही ते म्हणाले. त्याचबरोबर राऊत यांच्या या विधानावर भाजप नेते नीलेश राणे ( Nilesh Rane) यांनी त्यांना जोरदार टोला लगावला. संजय राऊत यांनी स्मृती स्थळावर माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली. “गेल्या वर्षी याच काळात सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरू होती. लोकांच्या मनात शंका होत्या. पण आज बाळासाहेबांच्या स्मृती स्थळार शिवसेनेचा मुख्यमंत्री तेसुद्दा उद्धव ठाकरे यांच्या रूपाने मानवंदना देण्यासाठी आले आहेत. बाळासाहेब आमच्यात नाहीत ही वेदना कायम राहील. पण बाळासाहेब आमच्यासोबत आहेत आणि सतत राहतील, प्रेरणा देतील असा विश्वास आहे,” असं यावेळी राऊत यांनी सांगितलं. तसेच, आजच्या दिवशी शिवसेनाप्रमुखांना आम्ही फक्त देहाने निरोप दिला, पण त्यांचे विचार, हिंदुत्व, मराठी बाणा हे सगळं आमच्यासोबत कायमस्वरूपी आहे.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हा वारसा पुढे नेऊ, देशात जिथे कुठे गरज पडेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन हजर राहील, असे राऊत यांनी म्हटले. यानंतर भाजप नेते नीलेश राणे यांनी राऊत यांच्या या वक्तव्यावर कडक शब्दांमध्ये टीका केली आहे. गरज पडल्यास जिथं तिथं हिंदुत्वाची तलवार घेऊन शिवसेना हजर राहील, या वाक्यावरून भाजप नेते नीलेश राणे यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. संजय राऊत हे नेलकटरलाही घाबरतात, पण वार्ता तलवारीच्या करतात, अशा शब्दांत नीलेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर आणखी एक टीका करत ट्विट करून शिवसेनेचा मराठी बाणा हा केवळ देखावा असल्याचं म्हटलंय. तसेच, ”हे बघा शिवसेनेचे मराठी प्रेम. संचालक मंडळामध्ये सगळे अमराठी. आम्ही नेहमी म्हणतो शिवसेनेला मराठी माणूस फक्त राजकारणासाठी लागतो इतर वेळेला शिवसेनेने मराठी माणसाला फाट्यावरच मारलं आहे.”, असं ट्विट राणेंनी केलं आहे.

मनसेची ( MNS) शिवसेनेवर टीका
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी, स्मारक की मातोश्री ३ असं ट्विट केलं होतं, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ३ वर्षांपूर्वी मुंबईच्या महापौरांचा बंगला हस्तांतरित करण्यात आला होता. परंतु मागील ३ वर्षांत या ठिकाणी कोणतीही हालचाल नाही, बंगला बंदिस्त अवस्थेत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे स्मारकाचे काय झाले, असा प्रश्न त्यांनी विचारला होता.

शिवसेनेचं उत्तर
मनसे नेते संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande) यांच्या टीकेनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी या टीकेला उत्तर दिले आहे. ज्यांनी बाळासाहेबांना हयातीत सोडलं त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर बोलू नये, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे.