Sanjay Sonawane | रिपाइं (आठवले) च्या शहर अध्यक्षपदी संजय सोनावणे यांची निवड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Sonawane | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) शहर अध्यक्षपदी संजय उद्धव सोनावणे यांची निवड झाली. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सोनावणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड झाल्याची माहिती, निवडणूक अधिकारी अ‍ॅड. बी.के. बर्वे यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. (Sanjay Sonawane)

पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेस पक्षाचे पदाधिकारी बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, मंदार जोशी हे उपस्थित होते. ऍड. बर्वे म्हणाले, शहर अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 3 डिसेंबर ला निवडणूक होणार होती. निवडणूक कार्यक्रमानुसार 24 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या मुदतीत सोनावणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड जाहीर करण्यात आली. 2 डिसेंबर ला लोणावळा येथे होणाऱ्या पक्षाच्या शिबिरात सोनावणे यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे, असे अ‍ॅड. बर्वे यांनी सांगितले. (Sanjay Sonawane)

अ‍ॅड. बर्वे यांनी सांगितले की, शहरात पक्षाच्या 2 हजार 210 क्रियाशील सदस्यांची नोंदणी झाली आहे. तर अन्य सदस्य एक लाख 8 हजारांहून अधिक आहेत. क्रियाशील सदस्यांमधून अध्यक्षपदाची निवड होणार होती. सोनावणे हे पुढील पाच वर्षांसाठी शहर अध्यक्ष असतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Govt News | खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वर्ष करण्याचा CM शिंदेंचा विचार

गोडावूनचा ताबा सोडण्यासाठी 17 लाखांची मागणी, पुण्यातील कामगार संघटनेच्या अध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, सहकारनगर व कोरेगाव पार्क परिसरातील घटना

Pune Crime News | लोणी काळभोर, कोंढवा आणि सिंहगड रोड परिसरात घरफोडीच्या घटनामध्ये 9 लाखांचा ऐवज लंपास

ACB Trap News | लाच स्वीकारताना महिला सरपंचासह पती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

रस्त्यात मिठी मारुन तरुणाला लुटले, नागरिकांनी आरोपीला पकडले

‘मला सलमान भाई म्हणतात’ पिंपरीत ‘कोयता भाई’ची दहशत

भररस्त्यात महिलेचा दुप्पटा ओढून विनयभंग, दोघांना अटक; लोणी काळभोर परिसरातील घटना

जुन्या भांडणातून भोसरीत तरुणावर सत्तुरने वार, दोघांना अटक

नेट बँकिंगचा पासवर्ड घेऊन महिलेची 15 लाखांची फसवणूक, पुण्यातील शनिवार पेठेतील प्रकार