सासवड-सुपा रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत : उध्दव भगत

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन (चंद्रकांत चौंडकर) – रस्त्यांवर असलेले खड्डे हे वाहनचालकांसाठी मोठा त्रास असतो. या खड्ड्यांचा अतोनात त्रास सहन करावा लागतो. तसंच या खड्ड्यानं अनेकांचे बळी सुद्धा घेतलेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे पुरंदर तालुक्यातील सासवड -पारगाव, मेमाणे- सुपा रस्त्यांवर खड्ड्यांची चाळण झालेली पाहायला मिळतेय. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ता खोदण्यात देखील आलेला आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अशाच खड्डेमय रस्त्यांवरून अनेक वाहने जात आहेत. खड्डेमय रस्ते असल्यामुळे प्रवाशांना पाठीचा त्रास, मणक्याच्या त्रास होत आहे. या रस्त्यावर अनेक अपघात देखील झालेले आहेत. इतकी बिकट अवस्था असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग सूस्त असल्याचेच चित्र आहे.

रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी उपाययोजना करीत नसल्याने लोकभावना तीव्र झाल्या आहेत. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी राजुरीचे सरपंच उध्दव भगत, माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके, पिसर्वेच्या सरपंच लक्ष्मी वाघमारे, टेकवडीच्या सरपंच मालन जाधव, नायगावच्या सरपंच दिपाली जगताप, रिसेच्या सरपंच नीता कामथे, पिसेच्या सरपंच शुभदा मुळीक, तसेच बाळासाहेब कड, किशोर खळदकर, चंद्रकांत चौंडकर, विपुल भगत, संतोष गायकवाड आदींनी केली आहे.

रस्त्यावर वारंवार खड्डे पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दखल घेऊन रस्त्यावररील खड्डे बुजवावेत. तसेच साईटपट्ट्याची कामे करून घ्यावीत.
– (उद्धव भगत, सरपंच, राजुरी, ता.पुरंदर, जि.पुणे)

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/