‘यामुळं एन्काऊंटरला प्रोत्साहन मिळते, निर्णयाचा फेरविचार व्हावा’

ADV

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन टीम – उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांचे हत्याकांड घडवणाऱ्या विकास दुबेच्या प्रकरणावरती बोलताना काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे की, कैद्यांच्या हातात बेड्या न घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांमुळे पोलिस एन्काऊंटरला प्रोत्साहन मिळते. त्याचा फेरविचार होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी ट्विट करुन व्यक्त केलं आहे.

राज्यमंत्र्यांची पोलिस ठाण्यात हत्या करणारा आणि बिकरु गावात आठ पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे याचा दहा जुलै रोजी कानपूरमध्ये एन्काऊंटर करण्यात आला. दुबेच्या एन्काऊंटरनंतर सोशल माध्यमात वेग वेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. विविध राजकीय पक्षातील नेत्यांनीही उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तर गुंड विकास दुबेच्या एन्काऊंटर बाबत काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट केलं आहे.

ADV

पृथ्वीराज चव्हाण ट्विटमध्ये म्हणाले, विकास दुबे एन्काऊंटरमुळे राजकीय नेते-माफिया यांच्यामधील अभद्र युतीचा पर्दाफाश होऊ शकणार नाही. कैद्यांच्या हातात बेड्या न घालण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांमुळे पोलिस एन्काऊंटरला प्रोत्साहन मिळत आहे. त्याचा फेरविचार होणे आवश्यक आहे, असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.