खा. उदयनराजे, आ. शिवेंद्रराजे यांनी कार्यकर्त्यांसोबत केली न्याहरी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा धुरळा ठिकठिकाणी उडत असून घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना जेवणासाठीही वेळ मिळत नाही. राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान २३ एप्रिल रोजी असल्याने अवघे काही दिवसच प्रचारासाठी उमेदवारांना मिळाले आहेत. हे लक्षात घेऊन दारोदारी प्रचार करण्यावर उमेदवार भर देत आहेत.

उठल्यापासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या धावपळीमुळे तहान-भूक हरवून जात आहे. या व्यस्त प्रचारातून उमेदवार कार्य़कर्त्यांबरोबर न्याहरी करताना दिसतात. सातरा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जावलीतील प्रचार मोहिमेदरम्यान एकत्रितपणे न्याहरी केली. आपला नेता आपल्या मांडीला मांडी लावून जेवण करत आहे, ही बाब सर्व कार्यकर्त्यांसाठी उत्साह भरणारी होती.

प्रचाराचे धुमशान अंतिम टप्प्यात पोहोचल्यामुळे उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बसल्या बसल्या हातातच ताट घेऊन या दोघांनी कार्यकर्त्यंसमवेत जेवणाचा आस्वाद घेतला. एरवी राजेशाही थाटात जेवणारे हे दोन राज्यांना असे एकत्र जेवण केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तर वाढलाच शिवाय या त्यांच्या एकत्रित जेवणाची सोशल मीडियावरील नेटकर्‍यांना मात्र चांगलीच मेजवानी मिळाली.

Loading...
You might also like