‘सौदी अरब’नं घेतला आश्चर्यकारक निर्णय ! महिला आणि परदेशी जोडप्यांना दिली ‘ही’ मोठी सुट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सौदी अरबने परदेशी महिला आणि पुरुषांसंबंधित काही मोठे निर्णय घेतले आहेत. याअंतर्गत आता त्यांना हॉटेलच्या रुममध्ये एकत्र राहण्याची परवानगी मिळाली आहे. पहिल्यांदा सोबत राहण्यासाठी स्त्री पुरुषांना आपले नाते सांगावे लागेत होते. हा निर्णय मुस्लिम साम्राज्याच्या नव्या टूरिस्ट वीजा धोरणातर्गंत घेण्यात आला. यामुळे पर्यटकांचा सौदी अरबमध्ये ओघ वाढेल.

सौदीच्या महिलांना हॉटेलमध्ये रुम बूक करण्याची परवानगी –
याशिवाय सौदी अरबच्या महिलांना देखील भाड्याने हॉटेलमध्ये रुम घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे महिलांना प्रवास करणे सोपे होईल आणि अविवाहित परदेशी पर्यटकांबरोबर राहण्याचा मार्ग मोकळा होईल. या मुस्लिम देशात लग्नाशिवाय शारीरिक संबंध ठेवण्यास बंदी आहे. कमीशन ऑफ टूरिज्म अ‍ॅण्ड नॅशनल हेरिटेजने सांगितले की आता सौदी नागरिकांना हॉटेलमध्ये चेक इन करताना आपल्या कुटूंबाचे ओळखपत्र किंवा नातेवाइकांचे ओळख पत्र दाखवणे आवश्यक असेल तर परदेशी प्रवाशांना ते अनिवार्य नसेल.

तेलावरील निर्भरता कमी करणे –
सौदी अरबच्या महिला एकट्या हॉटेलमध्ये थांबू शकतात आणि चेक इनवर त्यांना आयडी देण्यात येईल. सौदीने मागील आठवड्यात 49 देशांसाठी आपले दरवाजे उघडले कारण सौदी आता आपली अर्थव्यवस्थेला तेलाच्या निर्यातीवरील निर्भरता दूर करणार आहे. या अंतर्गत याच मुस्लिम देशाने घोषणा केली की आता पर्यटकांना बुरखा घालणे आवश्यक नाही. परंतू त्यांनी साजेसा पोशाख घालावा.

सौदीत दारुवर असलेली बंधन मात्र कायम आहेत. याच वर्षी सख्त सामाजिक नियमात मात्र सूट दिली आहे. सौदीच्या अधिकाऱ्यांना वाटते की 2030 पर्यंत येथे 10 कोटी लोकांनी यावे. मागील वर्षी सौदीने महिलांना गाडीचे परवाने देण्याचा आणि गाडी चालवण्याचा निर्णय घेतला. तर यावर्षी ऑगस्ट महिन्यात महिलांना कोणत्याही पुरुषाशिवाय प्रवास करण्याची मूभा दिली होती.

Visit : Policenama.com