खानवडी येथे सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइ (संदीप झगडे) – राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी निमित्त खानवडी (ता पुरंदर) येथील महात्मा फुले स्मारकामधील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सावित्रीबाई फुलेंचे सामाजिक कार्य फार महान आहे. स्री शिक्षणाची कवाडेेे सावित्रीबाई फुले यांनी महिलांना उघडून दिली. त्यामुळे आज महिला उच्च शिक्षण घेेेऊन उच्च पदावर आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले यांचा अभिमान बाळगणे गरजेचे आहे. भारतातील पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका होण्याचा बहुमान हा खऱ्या अर्थाने सावित्रीमाईंचाच असल्याचे बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धिवार यांनी व्यक्त केले.

या वेळी खानवडी गावच्या सरपंच वर्षा खोमणे, महात्मा फुले स्मारक समितीचे सचिव चंद्रकांत टिळेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता होले, भाऊ खोमणे, ज्ञानदेव क्षिरसागर, भारती क्षीरसागर, रतन टिळेकर यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता होले यांनी केले. तर आभार भाऊ खोमणे यांनी मानले.