SBI मध्ये पैसे गुंतविल्यास मिळू शकतात 55 टक्क्यांपेक्षा जास्त Return, ‘या’ 5 कारणांमुळं शेअर्समध्ये निश्चित येणार ‘तेजी’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोविड-19 (COVID-19) असूनही जूनच्या तिमाहीत देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया-एसबीआयने चांगली कामगिरी केली आहे. जून तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 81 टक्क्यांनी वाढून 4,189.34 कोटी रुपये झाला. त्याच वेळी बँकेने आपल्या एसेट क्वालिटी आणखी सुधारली आहे आणि अडकलेल्या कर्जाचे प्रमाण(रेश्यो) कमी झाले आहे. तज्ज्ञ निकाल पाहता बॅंकेच्या शेअरमध्ये तेजी दाखवत आहेत. FE च्या वृत्तानुसार, तज्ञाचे मत आहे की बँकेचे वैल्युएशन खूप आकर्षक आहे. बँकेचे शेअर लाँग टर्ममध्ये 50 टक्क्यांहून अधिक परतावा (रिटर्न) देण्याची क्षमता ठेऊन आहे. ब्रोकरेज हाऊस CLSA ने शेयरसाठी 310 रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. ही सद्य किंमत (करंट प्राइस)198 पासून 57 टक्के जास्त आहे. बँकेचे कर्ज कमी झाल्याने एकल निव्वळ नफा 81 टक्क्यांनी वाढून 4,189.34 कोटी रुपये झाला. त्याचबरोबर एंटरग्रेटेड नफा 62 टक्क्यांनी वाढून 4,776.50 कोटी झाला आहे. बँकेचे उत्पन्न 87,984.33 कोटी रुपये झाले आहे.

गुंतवणूकदारांनी एसबीआयमध्ये गुंतवणूक का करावी यासाठी ब्रोकरेज हाऊस सीएलएसए (ब्रोकरेज हाउस CLSA) ने शेयरवर 5 प्वॉइंटस दिले आहेत.

आपण एसबीआय शेअर्स का खरेदी करावेत हे जाणून घ्या

एसेट क्वालिटीच्या बाबतीत बँक इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा चांगली स्थितीत आहे. कोविड -19 काळातही बँकेची मालमत्ता गुणवत्ताही (एसेट क्वालिटी) सुधारली आहे. जूनच्या तिमाहीत बँकेची ग्रॉस एनपीए 5.44 टक्क्यांवर राहिला आहे, तर बँकेचा नेट एनपीए देखील 1.8 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

SBI चा बाजारातील वाटा (मार्केट शेयर) सतत वाढत आहे. खाजगी बँकांच्या तुलनेत अन्य सरकारी बँकांच्या बाजारातील वाटा (मार्केट शेयर) कमी झाला आहे. किरकोळ मालमत्ता (रिटेल एसेट्स), सीएएसए प्रमाण (कासा रेश्यो), एकूण कर्ज(ओवरआल लोन) आणि ठेवींच्या (डिपाूजिट) बाबतीत बँकेची स्थिती सुधारली आहे.

SBI ला येस बँक बेलआऊट पॅकेजच्या चांगल्या संरचनेचा लाभ मिळेल.

SBI च्या सर्व सहाय्यक (सब्सिडियरी) कंपन्यांमध्ये वाढ(ग्रोथ) चांगली आहे. मागील 3 ते 5 वर्षांत या कंपन्यांमध्ये 25 – 40% सीएजीआरच्या हिशोबाने वाढ दिसून आली आहे आणि अधिक कंपन्या आपापल्या क्षेत्रातील बाजाराचे (मार्केट) लीडर आहेत. त्यांना एसबीआयच्या वितरण सामर्थ्याचा (डिस्ट्रीब्यूशन स्ट्रेंथ)फायदा मिळत आहे.

SBIचे मूल्यांकन (वैल्युएशन) आकर्षक आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एसबीआयने आपली एक वर्षाची उच्चांकी 351 पातळी गाठली. म्हणजेच हा शेअर त्याच्या 1 वर्षाच्या उच्चांकाच्या तुलनेत 44 टक्के सूट (डिस्काउंट) वर ट्रेड करीत आहे.