अभिनेता सोनू सूदकडून गरजू मुलांना स्कॉलरशिप, असा करा अर्ज, जाणून घ्या माहिती

पोलीसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 14 सप्टेंबर : खलनायक सोनू सूदने आता गरजू मुलांना स्कॉलरशिप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात सोनू सूदने अनेकांना मदत केलीय. याच कोरोनाच्या या परिस्थितीत सोनू सूदने अनेक गरजू मुलांना शिक्षणात मदत केली आहे. मात्र, आता त्याने आणखी एक पाऊल पुढे टाकत स्कॉलरशिप सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे चित्रपटात खलनायकाची भूमिका करणारा सोनू सूद आता जीवनात हिरो ठरला आहे.

पैशाअभावी गरीब आणि गरजू मुलांना शिक्षण पूर्ण करता येत नाही. त्यांचे शिक्षण अर्धवट राहते. त्यामुळे अशा मुलांसाठी सोनू सूद सरसावला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावर याची माहिती दिलीय. तसेच सोनू सूदने याबाबत ट्वीट देखील केलंय.

सर्व शिक्षण घेतील तेव्हाच देश पुढे जाईल. उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी पूर्ण स्कॉलरशिप लाँच करत आहे. आर्थिक आव्हाने कोणत्याही लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी रोखू शकत नाहीत, असा विश्वास मला आहे. पुढील 10 दिवसांत तुम्ही [email protected] यावर एंट्री करून मी तुमच्यापर्यंत पोहोचेन, असे ट्वीट सोनू सूदने केलंय.

खलनायक सोनू सूद म्हणाला, आपले भविष्य, आपली क्षमता आणि मेहनत ठरवेल. आपण कुठून आलोय, आपली आर्थिक स्थिती काय आहे? याचा काही संबंध नाही. हा माझा एक प्रयत्न आहे. शाळा संपल्यानंतर पुढील शिक्षणासाठी पूर्ण स्कॉलरशिप, जेणेकरून तुम्ही पुढे जाल आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्याल. [email protected] यावर ई-मेल करा.

या पोस्टरमध्ये मॅनेजमेंट, वैद्यकीय, कायदे आणि शेतीविषयक अशा सर्व कोर्सेचा समावेश आहे. ज्याला आपले शाळेनंतरचे शिक्षण पूर्ण करायचे आहे, त्यांच्यासाठी आता आर्थिक अडचण राहणार नाही. कारण, त्यांना खलनायक सोनू सूदने मदतीचा हात दिलाय.

कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये स्थलांतरीत मजुरांना मदत करून बॉलिवूडमध्ये खलनायक अभिनेता सोनू सूद आता रिअल लाइफमध्ये हिरो ठरलाय. प्रवासी मजुरांशिवाय देशातील अनेक गरजूंना त्याने मदत केलीय. तसेच त्याने हेल्पालाइन जारी केलीय. याशिवाय सोशल मीडियावरही त्याला अनेक मेसेज येताहेत. सोनू सूदला दररोज हजारोंच्या संख्येने मदत मागणारे मेसेज येत आहेत. त्यातील जास्तीत जास्त लोकांना मदत पुरवण्याचा प्रयत्न सोनू सूद करत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like