Smartphone वापरणार्‍या मुलांची संख्या 2019 मध्ये दुप्पट ! 80 % मुलं सोशल मीडियावर तर लंडनमध्ये 4 वर्षाच्या मुलांकडे स्वतःचा ‘स्मार्टफोन-टॅबलेट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकालच्या मुलांना स्मार्ट गॅझेटचे खास आकर्षण असते, हे गॅझेट मुलांना स्मार्ट बनविण्यात देखील मदत करतात. यासाठीच ब्रिटनमधील ४ वर्षापासून ते १० वर्षाच्या ५० टक्के मुलांकडे आपला स्वतःचा स्मार्टफोन आहे. त्याचबरोबर ९ ते १० वर्षातील स्मार्टफोन वापरणाऱ्या मुलांची संख्या २०१९ मध्ये दुप्पट झाली असल्याची माहिती मीडिया रेग्युलेटर ऑफकॉम ने ‘द एज ऑफ डिजिटल इंडिपेंडेंस’ च्या वार्षिक अहवालात दिली.

ऑफकॉम या संस्थेने २०१९ मध्ये मुलांच्या सोशल मीडियाची सवय आणि अन्य काही गॅझेटचा वापर मुलं कसा करतात, याचे संशोधन केले आहे. त्यानुसार, यात मोबाइल फोनला मुलांची पहिली पसंती आहे. पालकांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या मुलांना विना इंटरनेटचे जग माहिती होत नाही. तसेच या अहवालानुसार, तीन ते चार वर्षांच्या १५ टक्के मुलांकडे स्वतःचा गॅझेट असून त्यांना तो २४ तास ठेवण्याची परवानगी आहे. १० वर्षापेक्षा मोठ्या असलेली मुले सोशल मीडियाचा वापर करत असून सामाजिक कारणे आणि संस्थेप्रति ते नेहमी अ‍ॅक्टिव असतात. तर १८ टक्के मुले ही कोणत्या तरी पोस्टला शेअर किंवा कमेंट करीत असल्याचेही या रिपोर्टाध्ये म्हंटले आहे.

या रिपोर्टनुसार, १७ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग यात भूमिका आहे. ४५ टक्के लोकांना असे वाटते कि, लहान मुलांनी इंटरनेटचा वापर करणे धोकादायक असले तरी ते तितकेच फायद्याचे आहे. पाच वर्षे ते १५ वर्षाची ४८ टक्के मुली आणि ७१ टक्के मुले ऑनलाइन गेम खेळत असतात. तर काही मुलांना वाईट व्हिडिओ पाहण्याची सवयही लागल्याने त्यांचे नुकसानही होत असल्याचे काहींनी म्हटले आहे. तसेच ८० टक्के मुले सोशल मीडियावर व्हिडिओ ऑन डिमांड पाहतात. तर ६२ टक्के मुलांना व्हॉट्सअ‍ॅप पाहायला आवडते. असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.