कमलेश तिवारी मर्डरकेस : 4 वर्षापुर्वी प्रथम लिहीली खूनाची ‘स्क्रिप्ट’, ‘हिंदू’ सहकार्‍याचं चोरलं ID ‘कार्ड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2015 मध्ये कमलेश तिवारी यांनी पैगंबर यांच्यावर विवादास्पद टिपण्णी केली होती त्यानंतर अनेक कट्टर पंथीयांनी त्यांच्याविरोधात फतवा काढला होता. एटीएसने नागपुरातून याबाबत सय्यद आसिम अली नावाच्या इसमाला अटक केली आहे. सय्यदने आपल्या युट्युब वरील अनेक व्हिडिओमध्ये तिवारी यांना मारणार असल्याचे आरोप केले होते.

सय्यद आसिम अली ‘सुन्नी युथ ब्रिगेड’ संगठन चालवतो आणि त्याचे युट्युब वर असंख्य व्हिडीओ आहेत ज्यात त्याने हिंदू संघटनांवर आणि भाजप सहित आरएसएसवर अनेक वादास्पद टिपण्णी केलेली आहे. व्हिडिओमध्ये सय्यद आसिम अली स्पष्टपणे तिवारी यांना आमची संघटना पाहून घेईल असे धमकी दायक विधान देत आहे. एटीएसच्या मते तो या हत्येच्या मास्टरमाइंडच्या संपर्कात देखील होता.

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार हत्याकांडातील सर्व आरोपी आपापसात सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडले गेलेले होते. अटक केलेल्या कोणाचेही कसल्याचे प्रकारचे जुने रेकॉर्ड नाही. हत्ये साठी आरोपीने रोहित सोळंकी नावाने नकली आधार कार्ड बनवले होते. तसेच अशफाक आणि मोइनुद्दीन या दोघांनी आपला पेहराव देखील बदलला होता. दोघांनीही आपण हिंदू वाटावे यासाठी दाढी काढली होती. अशपाकने रोहित नावाने फेसबुक वर येऊन कमलेश तिवारी सोबत मैत्री केली आणि त्यांच्याबाबतची प्रत्येक माहिती गोळा केली.

त्यानंतर पक्षात सामील होण्यासाठी त्यांनी कमलेश सोबत मीटिंग ठरवली त्यानंतर दोघेही लखनऊला aआले. मिठाईच्या डब्ब्यात ठेवलेल्या बंदुकीने अशपाक ने गोळ्या झाडल्या आणि मोईनुद्दीन ने गळा कापला. पोलिसांच्या मते हत्याऱ्यांनी आपला पेहराव हा खून करण्याच्या उद्देशानेच बदलला होता. सुन्नी विंग संघटनेच्या अनेक संशयितांवर सध्या पोलिसांची नजर आहे. एटीएसच्या मते या प्रकरणात अजून अनेक मोठे मोठे खुलासे होणार आहेत.

Visit : Policenama.com