काय सांगता ! होय, चक्क PAKच्या ‘या’ माजी कर्णधारानं केलं ‘मास्टर ब्लास्टर’चं ‘गुणगान’, म्हणाला – ‘दुसरा सचिन होणे नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघात नेहमीच कडवी स्पर्धा पाहायला मिळते. पाकिस्तानचे क्रिक्रेटपट्टू भारताच्या क्रिकेटपटूबद्दल फारसे चांगले बोलत नाहीत. पण भारताचा माजी महान क्रिक्रेटपटू सचिन तेंडुलकरचे पाकिस्तानच्या एका माजी कर्णधाराने कौतुक केले आहे. सचिन हा महान क्रिक्रेटपटू का होता, या गोष्टीचे त्याने चार मुद्दे मांडले आहेत.

कसोटी क्रिकेट मध्ये दोन धावा खेळणारा सचिन हा असा एकमेव क्रिक्रेटपटू आहे. १०० आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारा सचिनचं एकमेव आहे. २०१३ साली सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. त्यानंतर सचिनला आत्तापर्यंत कोणीही विसरू शकले नाही.

सचिनकडे धावा करण्याची आणि विक्रम प्रस्थापित करण्याची क्षमता नक्कीच होती. पण सचिनसारखा विचार कोणी करू शकत नाही. कधी काय करायचे, कशी खेळी पालटवायची हे सचिन ला चांगले माहित होते. असे पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने म्हटले आहे.

भारताचे माजी महान सलामीवीर सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा दहा हजार धावा केल्या होत्या. पण त्याचा विक्रम सचिनने मोडला. सचिन ज्या काळात खेळत होता, तेव्हा प्रत्येक धाव मोलाची होती. त्या काळी महान क्रिकेटपटू ८-९ हजार धावांपर्यंत येऊन थांबायचे. यावरून सचिन किती महान क्रिकेटपटू होता, हे समजले असेलच. असे इंझमाम म्हणाला.

सचिन एकामागून एक विक्रम सर करत होता. पण कधीही त्याचे क्रिकेटवरून लक्ष विचलित झाले नाही. सचिनची मानसीक कणखरता एवढी प्रबळ होती की, सचिन नेहमीच चांगल्या विचारांनी क्रिकेट खेळायचा. त्याला कितीही डिवचले तरी त्याचे लक्ष विचलित व्हायचे नाही. त्याचबरोबर सचिन हा केव्हाही कोणत्या गोलंदीजीला कधीच घाबरला नाही. असे इंझमामने सांगितले.