Coronavirus Update UP : प्रशासनानं वाढवली सक्ती, गौतमबुद्ध नगरमध्ये 30 एप्रिल पर्यंत कलम 144 लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरातील देशांमध्ये कोरोनाची दहशत पसरली असून भारतात देखील कोरोना संक्रमितांचा आकडा ३३०० च्या जवळ पोचला आहे. उत्तर प्रदेशच्या गौतमबुद्ध नगर देखील या व्हायरसने वाईट प्रकारे प्रभावी झाले आहे. अशात येथील प्रशासनाकडून ३० एप्रिल पर्यंत सीआरपीसी कलम अंतर्गत १४४ लागू केले गेले आहे. खरतर, शासन-प्रशासन शक्य होईल ते प्रयत्न करत आहे. लोकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत हे संक्रमण पुढे वाढणार नाही. पण अनेक प्रयत्नानांनंतर देखील लोकं ऐकायला तयार नाहीत.

गौतमबुद्ध नगरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या एकूण लोकांची संख्या ५० च्या वर गेली असून अशा परिस्थितीत सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत जेणेकरून या प्रकरणांना रोखले जाईल. त्याचबरोबर संपूर्ण उत्तर प्रदेशात संक्रमणाच्या प्रकरणांचा आकडा २०० च्या वर गेला आहे. या परिस्थितीला बघता संपूर्ण देशभरात लॉकडाउन लागू आहे.

‘… जेणेकरून नियमांचे उल्लंघन होणार नाही’
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहना नंतर लोकं रविवारी रात्री ९ वाजता लोकं आपल्या घराच्या दारात आणि बाल्कनीत दिवा, मेणबत्ती, फ्लॅशलाइट व मोबाईल लाइट लावतील. या कार्यक्रमात लॉकडाऊनची संपूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी नोएडा पोलिसांनीही तयारी केली आहे. डीसीपी नोएडा संकल्प शर्मा म्हणाले की, आमचे लोकांना आवाहन आहे कि त्यांनी घरातच राहावे. रात्री ९ वाजता लाईट बंद झाल्यावर पोलिस अधिक सतर्क होणार आहेत. सेक्टर आणि भागात ब्लॉक असेल जेणेकरून कोणीही समूहाने येणार नाही.