अकोला : जिल्ह्यात 36 कलम लागू ! पोलिस अधिकाऱ्यांना जादा अधिकार प्रदान

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात १७ ऑक्टोंबर ते ३१ ऑक्टोंबर पर्यंत “नवदुर्गा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच २५ ऑक्टोंबर रोजी विजयादशमी उत्सव व बौध्द धर्मियांचे वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमीत्त अकोला शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. उत्सव काळात अकोला जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार प्राप्त असलेल्या कलम ३६ अन्वये जिल्ह्यातील सर्व पोलीस उपनिरीक्षक व त्यांचेपेक्षा वरील दर्जाचे अधिकाऱ्यांना १७ ऑक्टोंबर ते ३१ ऑक्टोंबर पर्यंत पर्यन्त जादा अधिकार प्रदान केले आहे.

मुर्ती स्थापना व विसर्जन संबंधाने रस्त्यावरुन जाणाऱ्या किंवा इतर उत्सव अथवा जमावातील लोक अशारितीने चालतील त्यांची वर्तणुक कशी असावी ? या विषयी निर्देश देणे, मुर्ती स्थापना / विसर्जन व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेचे आसपास, उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याने किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकाच्या एकत्र जमण्याच्या जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवू न देणे. मु्ती स्थापना व विसर्जनाचे अनुषंगाने ज्या मार्गाने जाव्यात किंवा त्या मार्गाने जावू नयेत ते विहीत करणे, सर्व रस्त्यावर व नदयांचे घाटावर आणि सार्वजनिक स्नानाचे, कपडे धुण्याचे, उतरण्याचे ठिकाणी जागेमध्ये देवालय किंवा इतर सार्वजनिक किंवा लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त व सुव्यवस्था राखणे, कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविण्याचे किंवा गाण्याचे किंवा ढोल ताशे, शिट्ट्या व इतर कर्कश वाद्य वाजविर्ण वर्गरे बाबत नियम तयार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, सक्षम अधिकाऱ्यांनी या अधिनियमाचे कलम 33,36,37 ते 40, 42, 43, व 45 अन्वये केलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पृष्टी देणारे आदिचा समावेश आहे.

या आदेशाची कोणत्याही इसमाने कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येवून तो शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.