दरोडेखोरांच्या हल्ल्यात जेष्ठ नागरिकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरागाव मध्ये मध्यरात्री दीड वाजता दरोडेखोरांनी गडदे वस्तीतील एका घरातून शिरुन लुटमार केली. त्या मारहाणीत एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी झाली आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c96fca31-bb04-11e8-876d-f7dc3ea62620′]

केरबा भिवा गडदे (वय ६२, रा. डोंगरागाव) असे मृत्यू पावलेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. तर, मुक्ताबाई केरबा गडदे (वय ६१) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

याप्रकरणी त्यांची सून निर्मला अशोक गडदे (वय ३०, रा. डोंगरागाव) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, डोंगरागाव ही आडबाजूला वस्ती आहे. गडदे हे आपल्या पत्नीसह आपल्या घरात झोपले होते. दुसऱ्या खोलीत त्यांची सून झोपली होती. मध्यरात्री तिघा चोरट्यांनी अचानक गडदे यांच्या घरात शिरुन हल्ला केला. त्यांनी केलेल्या मारहाणीत केरबा गडदे यांचा जागीच मृत्यू झाला. चोरट्यांनी मुक्ताबाई यांच्या गळ्यातील मंगळसुत्र व नाकातील नथ हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला त्यांनी विरोध केल्याने चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात मारले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांचा राजीनामा

त्यांच्या आरडाओरडाने निर्मला गडदे या जाग्या झाल्या. चोरट्यांनी अंगात काळे जर्कीन, पांढरी पॅट घातली होती.याबाबत लोणीकंद पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा दरोडा टाकण्यापूर्वी या पैकी दोघे जण दोन दिवस गावात फिरताना दिसले होते. त्यानंतर त्यांनी आज मध्यरात्री दरोडा टाकला. पोलीस अधीक्षक संदीप पाटील हे घटनास्थळी रवाना झाले आहेत.