दुर्देवी ! 4 वर्षाच्या चिमुकल्याचा सेप्टिक टँकेमध्ये पडून मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गोवंडी परिसरातील ४ वर्षाचा आरिफ नसुल्ला शेख याचा शिवाजी नगर भागात खेळत असताना निर्माणाधीन असलेल्या सेप्टिक टॅंकमध्ये पडून मृत्यू झाला. आज सकाळी ५. १७ वाजता ही दुःखद घटना घडली. त्यामुळे गोवंडी परिसरात शोककळा पसरली आहे.

गोवंडी परिसरातील ४ वर्षाचा आरिफ नसुल्ला शेख शिवाजी नगर भागात खेळत असताना निर्माणाधीन असलेल्या सेप्टिक टॅंकमध्ये पडला. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी आले आणि आरिफला बाहेर काढून उपचाराकरीत राजावाडी रुग्णालयात नेले. पण रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. ही घटना गोवंडी येथील शिवाजी नगर परिसरातील हनुमान मंदिराजवळ घडली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून अधिक तपास गोवंडी पोलीस करत आहेत.