आंतरराष्ट्रीय गायक पाठक यांच्या खून प्रकरणात धक्कादायक ‘खुलासा’, उलगडणार अनेक ‘गोष्टी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शामली येथे पाठक कुटूंबाच्या हत्येनंतर आरोपी हिमांशूला पकडण्यात आले होते त्यावेळी त्याने मात्र लुटीसंदर्भातील माहिती दिली नव्हती.परंतु पोलिसांनी त्याला रिमांडमध्ये घेताच त्याने चोरीसाठी या घरातील चार जणांची हत्या केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अजूनही तो काहीतरी लपवत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

एसपी विनीत जयस्वाल यांनी सांगितले की, आरोपी अजूनही रिमांडमध्येच आहे. एसआयटीकडून अजूनही त्याची चौकशी सुरु आहे. आतापर्यंत इतर कोणत्याही आरोपीचे नाव यामध्ये आलेले नाही. या आरोपीने सांगितलेल्या माहितीचे क्रॉस क्रॉस व्हेरिफिकेशन सुरु आहे. त्यामुळे याबाबत आणखी काही खुलासे देखील होऊ शकतात. लुटीची किंमत जवळ जवळ 50 लाख रुपयांपर्यंत सांगण्यात आली आहे.

त्याचबरोबर एसपी यांनी असे देखील सांगितले की मारेकऱ्याने अटकेच्या वेळी सांगितले होते की त्याच्यावर बँक कर्ज आहे. त्याचा हप्ताही वेळेवर जमा करता आला नाही म्हणून बँकेने वसुलीची नोटीसही बजावली आहे. एसपीच्या म्हणण्यानुसार, आता रिमांडवर आल्यानंतर एसआयटीच्या चौकशी दरम्यान आरोपीने सांगितले की तो आर्थिक संकटात सापडला होता. काही दिवसांपूर्वी मी दिल्लीच्या एका टॅक्सी कंपनीत काम करण्याचा प्रयत्न करीत होतो. यासाठी त्यांनी दिल्लीच्या संतनगरमध्ये एक खोली भाड्याने घेतली होती.

एसपी म्हणाले की, अजय पाठक यांचे निकटचे शिष्य असल्याने आरोपी हिमांशूला घरात ठेवलेल्या वस्तू, दागिने इत्यादी गोष्टी आधीच माहिती होत्या. यामुळेच त्याने अजय पाठक कुटुंबाची हत्या केली आणि त्यानंतर घरात ठेवलेले सर्व मौल्यवान दागिने व सामान लुटून पळ काढला.त्यानंतर कारमधून त्यांचे मृतदेह हिमांशू दुसरीकडे नेऊन टाकणार होता परंतु त्या आधीच या सर्व घटनेचा उलगडा झाल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.

चावीने उघडले कपाट
मारेकऱ्याला कोणत्या कपाटाची चावी कोठे असते याची पूर्ण माहिती होती. त्यामुळे त्याने जे कपाट बंद होते त्याची चावी शोधली आणि तेथून घरातील सगळे सामान घेऊन तो कारच्या साहाय्याने फरार झाल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली.

मारेकऱ्यासोबत होते का कोणी साथीदार ?
यामध्ये सध्या तरी केवळ हिमांशू सैनी हाच आरोपी असल्याचे समोर आले आहे. परंतु आरोपीने पुढे कारचे काय केले ? यासाठी त्याला आणखी कोणी मदत केली. याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

रिमांड कालावधी वाढू शकतो
एसपी विनीत जयस्वाल यांनी सांगितले की,मारेकऱ्यांची चौकशी करण्यासाठी त्याच्याकडे मंगळवारपर्यंत रिमांड कालावधी आहे. यानंतरही चौकशीची किंवा पुरावा संकलनाची गरज भासल्यास रिमांड कालावधी वाढविण्याचा अर्ज न्यायालयात देण्यात येईल. या व्यतिरिक्त, मारेकऱ्याची पॉलीग्राफिक किंवा इतर कोणतीही चाचणी घेण्याची आवश्यकता असल्यास, त्यासाठी कायदेशीर मत घेतल्यानंतर कारवाई केली जाईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/