शरद पवारांचा मोदींना टोला ; म्हणाले माझ्या पुतण्यानं…

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – माझ्या पुतण्याने सगळ्या घराचा कारभार केला तरी मला चिंता नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्धा येथील प्रचार सभेत पवार कुटुंबावर टीका केली होती. त्यावर उत्तर देताना जालना जिल्ह्यातील परतूर येथील सभेत त्यांनी ही टीका केली.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ११ एप्रिल रोजी देशातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पहिली सभा वर्धा येथे झाली. त्यावेळी, मोदींनी शरद पवार व परिवरावर जोरदार हल्लाबोल चढवला. दरम्यान, याचेच प्रत्युत्तर देतांना, मोदी मला भेटतील तेव्हा मी त्यांना सांगणार आहे की माझ्या पोरीचे लग्न झाले आहे, मला कसली चिंता नाही. माझ्या पुतण्याने सगळ्या घराचा कारभार केला तरी चिंता मला नाही. असे शरद पवार यांनी म्हंटले. याचबरोबर, माझ्या घराची उठाठेव तुम्हाला कशाला असेही मी त्यांना विचारणार आहे. असेही त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, आमच्या घरात मुलगी आहे, बायको आहे, तसेच इतर नातेवाईकही येत असतात. मात्र नरेंद्र मोदींच्या घरात कोणीच नाही. म्हणून मोदींना घर कसे चालवायचे हेच माहित नाही. त्यामुळे ते दुसऱ्याच्या घरात डोकावतात. त्यामुळे त्यांची भेट झाल्यावर मी त्यांना सांगणार आहे की, असं वागणं बरं नव्हं मोदीजी. असेही त्यांनी म्हंटले.

You might also like