Sharad Pawar | शरद पवारांचा नाना पटोलेंना टोला, म्हणाले – ‘लहान माणसावर बोलणार नाही’

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ज्या लोकांना तडजोड करायची नसेल आणि सोबत राहून पाठीत सुराच खुपसायला जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील (MVA government) घटक पक्ष असलेल्या काँग्रेसची (Congress) नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. यावरुन आघाडी बिघाडीच्या दिशेने जात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नाना पटोले (Nana Patole) यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी लहान माणसांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही, असं ते म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) बारामतीत बोलत होते.

Sharad Pawar comment on congress nana patole in pune

MNS Chief Raj Thackeray | महापालिका निवडणुकांसाठी मनसेची मोर्चेबांधणी सुरु, राज ठाकरेंचा पुण्यात ‘एकला चलो रे’चा नारा

ADV

ती लहान माणसं आहेत

नाना पटोले यांच्यासारखी माणसं लहान आहेत, त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही. या गोष्टीत मी पडत नाही. जर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) या काही बोलल्या असत्या तर मी बोललो असतो, असं म्हणत शरद पवार यांनी नाना पटोले यांना टोला लगावला. नाना पटोले वारंवार स्वबळाचा नारा देत आहेत. पण, त्यांनी लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना ते सोबत राहून पाठीत सुरा खुपसत आहेत, असा गंभीर आरोप केला होता. यावरुन महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहे.

बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री कुणाचेच ऐकत नाहीत

कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत ते कुणाची काम करतात. आपल्या लोकांची कामं करतात का ? मग आपण संपर्कमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो, पण संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की नाही ते त्यांनी ठरवायचं… कारण सही त्यांची लागते. संपर्कमंत्र्यांची सही लागत नाही, असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला.

सोबत राहून पाठीत सुराच खुपसायचा असेल तर…

कोणत्याही समितीवर नाव पाठवायची असतील तर पालकमंत्र्यांची सही लागते. हा जो त्रास आहे, या
त्रासाला तुम्ही आपली ताकद बनवा. या त्रासाला आपली मानसिक कमजोरी बनवू नका, असा सल्ला
त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. मी माझ्या कर्माने उद्याच्या काळात इथला पालकमंत्री (Guardian
Minister) बनेल, आमच्या पक्षाचा माणूस या खुर्चीवर बसेल ही ताकद घेऊन निघालं पाहिजे. ज्या लोकांना तडजोड करायची नसेल, सोबत राहून पाठीत सुराच खुपसायचा असेल तर आपल्यालाही काही बोलायचंच नाही. तो राग आपली ताकद बनवा, असेही नाना पटोले म्हणाले.

हे देखील वाचा

Ahmadnagar News | कौटुंबिक वादाच्या प्रकरणात डॉक्टर व त्याच्या कुटूंबियांना जामीन

PM Kisan | तुम्ही सुद्धा केली असेल ‘ही’ चूक तर अडकू शकतात 9 व्या हप्त्याचे 2000 रुपये ! ‘या’ पध्दतीनं करा दुरूस्ती

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Sharad Pawar comment on congress nana patole in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update