Sharad Pawar | ‘… ते वक्तव्य मजेत केलं’, पहाटेच्या शपथविधीच्या वक्तव्यावरुन शरद पवारांनी भूमिका बदलली?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सकाळच्या शपथविधीचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. अजित पवार यांच्यासोबतचा शपथविधी शरद पवारांशी (Sharad Pawar) चर्चा करुन झाला होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीसांच्या या वक्तव्यावर अजित पवार काहीच बोलले नाहीत. तर शरद पवार यांनी यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहाटेच्या शपथविधी बाबत केलेल्या वक्तव्यावरुन भूमिका बदलल्याचे पाहायला मिळत आहे.

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, आता अजित पवारांनी बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट (President’s rule) उठवली असती का? उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाले असते का? समजने वाले को इशारा काफी है, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.

या वक्तव्यावरुन दोन दिवसानंतर शरद पवार यांनी पुन्हा यावर भाष्य केलं आहे. राष्ट्रपती राजवट हटली त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, हे मी मजेत बोललो होतो. फडणवीसांनी माहिती द्यावी, त्याला मी इतके महत्व देत नाही. शरद पवारांच्या बोलण्यामुळे राष्ट्रपती राजवट लागते, इतके माझे महत्त्व आहे, चांगलं आहे, असा टोला त्यांनी लगावला.

Web Title :- Sharad Pawar | maharashtra president rule statement was in fun says sharad pawar on devendra fadnavis ajit pawar oath

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Akshay Kumar | अखेर अक्षय कुमारने कॅनडाचे नागरिकत्व नाकारले; ‘या’ देशाच्या नागरिकत्वासाठी केला अर्ज

Nayanthara | साऊथ सुपरस्टार नयनतारा अभिनय सोडणार? लग्न- मुलांच्या जन्मानंतर तिने केला मोठा खुलासा

Prajakta Mali | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची लेडी क्रश आहे प्राजक्ता माळी; प्राजक्ता माळीची लेसबियन पार्टनर व्हायची इच्छा केली व्यक्त