Sharad Pawar On Rajya Sabha Election Results | राज्यसभा निवडणूक निकालानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘चमत्कार मान्यच केला पाहिजे’

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar On Rajya Sabha Election Results | राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. निवडणूक रिंगणात सात उमेदवार होते. मतदानानंतर भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) काही प्रतिस्पर्धी आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतल्याने मध्यरात्रीच निकाल लागला. त्यावेळी शिवसेनेचे (Shivsena) सुहास कांदे (Suhas Kande) यांचे मत बाद करून इतर मतांची मोजणी झाली. त्यामध्ये भाजपचे तीन तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी (Sharad Pawar On Rajya Sabha Election Results) झाले. दरम्यान, शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा धक्कादायक पराभव झाला. संजय पवार (Sanjay Pawar) यांचा केवळ दोन मतांनी विजय हुकला आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी भाष्य केले आहे.

शरद पवार म्हणाले, राज्यसभा निवडणुकीचा लागलेला निकाल हा धक्कादायक असा नाही. वास्तविक महाविकास आघाडीतील पक्षांनी मतांचा जो कोटा ठरवला होता त्यामध्ये काही फरक पडला नाही. त्यामुळे आमच्यातील कोणीही फुटलेले नाही. उलट प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना एक मत जास्त मिळालं ते अपक्ष आमदारच आहे. मला सांगूनच त्या आमदाराने तसं केलं होतं. दुसरीकडे भाजपने अपक्षांना आपल्या बरोबर घेण्याचा प्रयत्न केला त्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे फरक पडला. चमत्कार झाला हे मान्यच केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माणस आपलीशी करण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी झाले असेही ते म्हणाले.

ADV

 

Web Title :- sharad pawar reaction on rajya sabha election 2022 results devendra fadnavis shiv sena bjp congress ncp prafulla patel

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा