Sharad Pawar On The Kashmir Files | ‘काश्मीर फाइल्स चित्रपटामुळे…’; शरद पवारांचा थेट पंतप्रधानांवर निशाणा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Sharad Pawar On The Kashmir Files | मार्च महिन्यात देशभर रीलीझ झालेल्या ‘काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपटावरून राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या चित्रपटाबाबत बोलताना थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. (Sharad Pawar On The Kashmir Files)

 

या चित्रपटामुळे एक विचार मारला जातोय. त्यात गांधीजी (Mahatma Gandhi), नेहरू यांचा काय संबंध? यातून देशातलं बंधुप्रेम संपवलं जात आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना, आता पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session) विरोधी पक्षातील नेते सभागृह सोडून गेले होते यावरूनही पवारांनी टीका केली आहे. (Sharad Pawar On The Kashmir Files)

 

महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन (Maharashtra Assembly Session) सुरु होतं, तेव्हा एका दुपारी एकही आमदार सदनात नव्हता.
ते सगळे चित्रपट पाहायला गेले होते. असंच सुरु राहिलं तर देशात एकता राहणार नाही.
इतकंच नाही तर, देशातील धर्मनिरपेक्षतेवर भाजपचा विश्वास नाही.
त्यात काही पाठिंबा भाजपला मिळाला आणि सत्ता त्यांच्याकडे आली, असं शरद पवार म्हणाले.

 

दरम्यान, एक चित्रपट येतो, त्यात काश्मिरी पंडितांवर (Kashmiri Pandit) हल्ले झाले आणि ते हल्ले काँग्रेस (Congress) आणि अल्पसंख्यांकांनी केले
हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. हिंदुंवर अत्याचार झाले हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Sharad Pawar On The Kashmir Files | sharad pawars criticism of pm narendra modi and bjp on the issue of the kashmir files movie

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sharad Pawar | साधी राहणी उच्च विचारसरणी ! शरद पवारांचा ‘तो’ फोटो होतोय तुफान व्हायरल

 

Rashmika Mandanna Upcoming Movie | रश्मिका मंदानानं ‘या’ नामवंत अभिनेत्रीकडून हिसकवून घेतली बिग बजेट फिल्म, आगामी चित्रपटात करणार रणबीर कपूर सोबत रोमान्स !

 

MLA Madhuri Misal | खाजगी सोसायट्यांमध्ये शासन आणि महापालिकेच्या निधीतून कामे करण्यास परवानगी मिळावी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार माधुरी मिसाळांनी केली मागणी (Video)