Sharad Pawar | ‘सुप्रियानं’ साकारला शरद पवारांचा पुतळा; खा. सुप्रिया सुळेंकडून ‘कौतुक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Sharad Pawar | पुण्यातील आंबेगाव येथील शिल्पकार सुप्रिया शिंदे (Craftsman Supriya Shinde) या राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा पुतळा बनवण्याचे काम करीत आहेत. दरम्यान, याठिकाणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी नुकतीच हजेरी लावली आहे. त्यावेळी हुबेहूब शरद पवार यांचा पुढं पुतळा पाहून खा. सुप्रिया सुळे या चांगल्याच चकित झाल्या आहेत. आंबेगाव परिसरातील विकासकामांच्या लोकार्पण दौऱ्यावेळी सुळे यांनी पुतळ्याच्या कामा ठिकाणी भेट दिली. त्यावेळी शिंदे याचं आकर्षक काम बघून त्यांनी त्याचं कोतुक केलं आहे.

सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) म्हणाल्या की, पुणे येथील सुप्रिया शेखर शिंदे या शिल्पकार तरुणीच्या वर्कशॉपला भेट दिली.
या वर्कशॉपमध्ये सुप्रिया करीत असलेले काम थक्क करणारे आहे. येथे त्यांनी राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि बालशिवाजी यांचे देखणे शिल्प साकारले आहे.
याशिवाय आदरणीय शरदचंद्रजी पवार (Sharad Pawar) साहेबांचे शिल्पही चित्तवेधक आहे, अशा शब्दात खा. सुळे यांनी शिल्पकार सुप्रिया शिंदेचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

 

 

 

कोण आहेत सुप्रिया शिंदे?

पुण्यातील आंबेगाव येथील सुप्रिया शिंदे (Craftsman Supriya Shinde) या शिल्पकार आहेत.
माहेरी वडिलांच्या गणपती बनवण्याच्या कारखान्यात मातीला आकार देणाऱ्या सुप्रिया यांनी भारती विद्यापीठातील फाईन आर्टस् महाविद्यालयातून शिक्षण घेऊन शिल्पकलेला सुरूवात केली.
पती शेखर शिंदे यांच्या भक्कम आधारावर माती, प्लॅस्टर, फायबर ते थेट पंचधातूचे पुतळे बनवण्यात यशस्वी झाल्या.

दरम्यान, मागील 8 वर्षांत मागणी प्रमाणे शेकडो कलाकृती आणि पुतळे राज्यासह देशभरात पोहचवल्या आहेत.
या दरम्यान शरद पवार यांच्या पुतळ्याची संकल्पना पुढे आली. आणि त्यांनी ते आव्हान पेलले आहे.
विशेष म्हणजे या कामाची फायबर कॉपी पुर्ण होवून पंच धातूचे 2 भाग पुर्ण झाले आहेत.
शरद पवार यांच्या चेहर्यातील अत्यंत सुक्ष्म बारकावे ठळकपणे टिपण्यासाठी शिंदे यांनी अधिक कष्ट घेतले आहे.
र, नेताजी सुभाषचंद्र बोस, रंगनाथ स्वामी, स्वामी नारायण, सुखदेव व भगतसिंह यांचे धातूचे पुतळे बनवून दिले आहेत.
माजी खासदार कै. किसनराव बाणखीले यांच्या पुर्णाकृती पंचधातूच्या पुतळ्याचे काम पुर्ण केले आहे.

 

Web Title : Sharad Pawar | supriya realizes sharad pawars statue mp supriya sule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

LPG Cylinder Subsidy | तुम्हाला एलपीजी सबसिडी मिळत नाहीये? मग करा ‘हे’ काम; त्वरीत जमा होतील पैसे; जाणून घ्या

CM Uddhav Thackeray | शिर्डी विमानतळाच्या सभोवताली सर्व सुविधायुक्त शहर वसवलं जाणार

Mira Bhayandar Crime | मिरा भाईंदर मनपातील अभियंत्याच्या कारवर गोळीबार, परिसरात खळबळ