Sharad Pawar Vs Ajit Pawar | शरद पवार गटाचे 10 झणझणीत सवाल, स्वाभिमानी अजितदादा दिल्लीपुढे का झुकले? ED ला का घाबरले?

मुंबई : Sharad Pawar Vs Ajit Pawar | निवडणूक आयोगाच्या सुनावणीदरम्यान अजित पवार यांच्यासाठी भेकड शब्द वापरल्याने या शब्दावरून अजित पवार गटाने शरद पवार गटाला खडेबोल सुनावले आहेत. अजित पवार गटाचे सध्या कर्जत येथे दोन दिवसीय राज्यव्यापी शिबिर सुरु आहे. या शिबिरात सुनील तटकरे यांनी ही तोफ डागली. यावर शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी तटकरेंवर पलटवार करत १० झणझणीत प्रश्न विचारून उत्तरे मागितली आहेत. (Sharad Pawar Vs Ajit Pawar)

शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी याबाबत एक्स हँडलवरून एक पोस्ट केली असून ती पोस्ट राष्ट्रवादीच्या अधिकृत एक्स हँडलने रिपोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये लवांडे यांनी म्हटले आहे की, अजितदादा भेकड नाहीत, दिलेला शब्द पाळणारे अजितदादा, प्रशासनावर वचक असणारे अजितदादा, भाजपासोबत सरकार आणि ४३ आमदारांचा पाठिंबा आणि घड्याळ तेच वेळ नवीन…. वगैरे वगैरे भाषणबाजी करणारे निवडणूक आयोगाकडे नोंदणी नसलेल्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आपण माझ्या सामान्य प्रश्नांची उत्तरे द्याल का ? (Sharad Pawar Vs Ajit Pawar)

लवांडे यांनी अजित पवार गटाला विचारलेले १० प्रश्न…

१) अजितदादा भेकड नसते हिम्मत असती तर स्वतःचा नवा पक्ष स्थापन केला असता. पण तसे न करता पक्ष संस्थापक आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कुणाच्या आधाराने हक्क दाखवत आहात? स्वाभिमानी अजितदादा दिल्लीपुढे का झुकले? ईडी ला का घाबरले? त्यांनी ईडीला मा. पवार साहेबांनी जसे आव्हान दिले होते तसे जाहीर आव्हान का दिले नाही? तुम्ही सर्वजण भेकड की अटकेला घाबरले?

२) प्रशासनावर वचक असता तर प्रशासनातील प्रचंड भ्रष्टाचार, काम चुकारपणा कसा व का वाढला? जनतेची जातीचे दाखले ते इतर योजनांची विविध स्तरावर कामे प्रलंबित का आहेत? झिरो पेंडंसी का नाही? ४ महिन्यात कोण सार्वजनिक महत्वाची कामे केली? मराठा आरक्षण मुद्यावर काय भूमिका बजावली? भुजबळांना पाठींबा की मराठा आंदोलकांना पाठींबा हे कधी सांगणार?

३) सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा घेत नाही त्याला तुमचा पाठींबा आहे का? कारण आधी अजितदादा सतत मागणी करत होते आत्ता गप्प का?

४) ४३ आमदारांची घेतलेली पाठिंब्याची प्रतिज्ञापत्र दिशाभूल करून दबावाखाली जबरदस्तीने घेतली की नाही? त्यांचा सर्वांचा एकत्रित फोटो व्हिडिओ जनतेला का दाखवत नाही?

५) खोके सरकारमध्ये अजितदादा डीसीएम २ आहेत हे दादांचे प्रमोशन की डिमोशन आहे? हा दादांचा स्वाभिमान की आणखी काय समजायचे ?

६) घड्याळ तेच वेळ नवीन, कुठून येतो इतका आत्मविश्वास? दिल्लीची अदृश्य शक्तीमुळेच ना?

७) देशाच्या पंतप्रधानांनी भोपाळ सभेत जाहीरपणे केलेला ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा व भ्रष्टाचाराचा आरोप केला तो खरा की खोटा होता? त्याबाबत अधिकृत खुलासा कधी होईल?

८) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आजपर्यंत भाजपाने जे जे विविध भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते कुणावर केले होते? पक्षाची कायमच बदनामी कुणामुळे होत होती?

९) तुम्हाला सर्वांना अनेक वर्ष मंत्रीपदे मिळाली सत्ता उपभोगायला मिळाली, निवडणुकीत मते मिळाली कुणामुळे? राज्यात सर्व तुमच्या सर्वांच्या हातात सत्ता व पक्ष होता तो पक्ष का वाढवला नाही? लहान मोठे सर्वत्र ठेकेदार कुणी जपले होते?

१०) आपल्याला राजकीय पटलावर ज्यांनी मोठी ओळख निर्माण करून दिली त्या आदरणीय शरद पवार साहेबांच्या बाबत कृतज्ञता व्यक्त करता येत नसेल तर किमान कृतघ्नपणा तरी का करता?

असे तिखट प्रश्न शरद पवार गटाने अजित पवारांना विचारले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Narayan Rane | राणे पत्रकारांवरच भडकले, कोण आहे जरांगे पाटील? मी ओळखत नाही, कशाला सतत नाव घेता…

Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंची विरोधकांवर टीका, देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक

Praful Patel | शरद पवार-अजित पवार एकत्र येणार? प्रफुल्ल पटेल स्पष्टच म्हणाले – ”घड्याळ तेच वेळ नवी…”

Pune Pimpri Crime News | बँक खाते हॅक करून महिलेला लाखोंचा गंडा, वाकड परिसरातील घटना

Pune Crime News | आत्महत्या करण्यापुर्वी बनवला व्हिडीओ अन् इमारतीच्या 6 व्या मजल्यावरुन उडी मारून तरुणाची आत्महत्या, कोंढवा परिसरातील घटना