Shardiya Navratri 2020 : या वेळी नवरात्रीत येतोय ‘हा’ योग, घोड्यावर बसून येणार दुर्गामाता

पोलीसनामा ऑनलाइन – यावेळी अधिक महिना असल्यामुळे शारदीय नवरात्र एक महिना पुढे गेली आहे. यावर्षी १७ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र सुरू होणार आहे. दरवर्षी पित्रपक्षांच्या अमावस्येनंतर नवरात्र सुरू होते, यावेळी अमावस्या आणि नवरात्रात एक महिना लागला. अधिक महिना असल्यामुळे असे झाले.

या नवरात्रात अनेक चांगले योग बनत आहेत. ही नवरात्र १० दिवस असेल. नवरात्रीच्या नऊ दिवसात आईच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. या नवरात्रात ग्रहांची स्थिती अशी आहे की, नवरात्रात विशेष योग बनत आहेत. यावर्षी नवरात्रात राजयोग, द्विपुष्कर योग, सिद्धियोग, सर्वार्थसिद्धी योग आणि अमृत योग असे योग तयार होत आहेत. शनिवारपासून नवरात्र सुरू होत आहे. या नवरात्रात दोन शनिवारही येत आहेत. असे म्हटले जाते की, नवरात्रात दुर्गामातेचे पठण करणे खूप चांगले असते.

यावेळी नवरात्रात माता दुर्गा घोड्यावर स्वार होऊन येत आहे. असे म्हणतात की, मातेच्या वाहनाच्या स्वरूपात भविष्यातील बरेच संकेत मिळतात. यावेळी माता घोड्यावर स्वार होऊन येत आहे, ज्याला एक चांगला संकेत मानले जात नाही. १७ ऑक्टोबरला अभिजीत मुहूर्ताला घटस्थापना उत्तम असेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like