शिफा पठाण ची ‘युनिस्को क्लब’ चित्रकला स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर निवड

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचलित आय.एस.ओ. मानांकित जिजामााता प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीच्या शंभर विद्यार्थ्यांनी युनिस्को क्लब मित्सुबिशी एशियन इंकी फेस्टा चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला होता. शाळा युनिस्को क्लबची सदस्य आहे. इयत्ता चौथीची विद्यार्थीनी शिफा समिर पठाण हिचा प्रथम क्रमांक आला असुन तिच्या चित्राची २८ राज्यांमधुन राष्ट्रीयस्तरावर निवड झाली आहे.

निसर्ग व वातावरण, आवडता खेळ, कुटंब व मित्र, शालेय सहजीवन, स्थानिक सण उत्सव / पारंपारिक कला या पाच विषयांवर राष्ट्रिय स्तरावर चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. पैकी सहा ते बारा या वयोगटीतील पाच विद्यार्थ्यांच्या चित्रांची निवड राज्य स्तरावर झाली होती. पैकी महाराष्ट्रातून शिफा पठाण हिच्या चित्राची निवड दिल्ली येथील युनिस्को मुख्यालयात करण्यात आली. स्पर्धेचे नियोजन युनिस्को क्लबचे समन्वयक समिर देवडे यांनी केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक शिफा पठाण, द्वितीय श्रद्धा राऊत, तृतीय विघ्नेश बोराडे, चतुर्थ संचिता पिंगट, पाचवी आस्था चव्हाण यांनी पारितोषिक पटकावले.

या विद्यार्थ्यांना प्रजासत्ताकदिनी प्रमुख अतिथी सखाहरी आव्हाड गुरूजी राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक यांचे शुभहस्ते पारितोषीक देवून गौरविण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, संचालक शंतनु पाटील, पं.सं.सदस्या रंजना पाटील, संचालिका नीता पाटील व सर्व संचालक मंडळ व संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील, उपस्थित सर्व पत्रकार बांधव, मुख्याध्यापक अनिस काझी व उपशिक्षक भामरे कैलास, सुहास बच्छाव, दिलीप शिरसाठ, राजाराम जाधव, केदुबाई गवळी योगिराज महाले, हर्षदा बच्छाव, बद्रिप्रसाद वाबळे, बाळासाहेब वाजे यांनी अभिनंदन केले.