शिल्पा शेट्टीचा मोठा खुलासा, श्रीलंकेच्या बॉम्ब स्फोटात थोडक्यात वाचले तिचे पती राज कुंद्रा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – श्रीलंकेत झालेला बॉम्ब स्फोट कोणी विसरु शकत नाही. या स्फोटात जवळजवळ २५० लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये काही लोक जखमी ही झाले होते. त्या घटनेची आठवण काढून बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीने एक मोठा खुलासा केला आहे. तिने नेमका काय खुलासा केला ते सविस्तर जाणून घेऊया.

एका इव्हेंटमध्ये तिने अशी घटना सांगितली की ती ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटेल. शिल्पा ने सांगितले की, श्रीलंकेत झालेल्या बॉम्ब स्फोटात तिचे पती राज कुंद्रा थोडक्यात वाचले. त्या स्फोटात मृत्यू झालेल्या लोकांच्या परिवाराबद्दल मला खुप सहानभूती वाटते. हा प्रसंग खुप भितीदायक होता. मी अजुनही कोणाला या प्रसंगाबद्दल सांगितले नाही. पण, माझ्यासाठी खुप भितीदायक घटना होती. ती म्हणजे माझे पती राज कुंद्रा त्यांच्या मित्रांसोबत त्या हॉटेलमध्ये थांबणार होते. जिथे हा प्रसंग घडला. देवाच्या कृपेने ते तिथे गेले नाही.

https://www.instagram.com/p/Bw_1GfjhFR_/?utm_source=ig_embed

ती पुढे म्हणाली की, अशा घटनेमधून असे कळते की आपल्या आयु्ष्याचा काही भरवसा नाही. राज आणि मी आम्ही दोघे खुप भाग्यवान आहोत की आमच्या सोबत ही घटना घडली नाही. हे एकताच तेथिल लोक आश्चर्यचकीत झाले. हे सांगताना शिल्पासोबत पती राज आणि मुलगा वियान होते. सध्या शिल्पा ‘डांस रिअ‍ॅलिटी शो सुपर डान्सर चॅप्टर ३’ प्रोग्रॅम जज करत आहे.