शिर्डीत साई दर्शनाला जाताना तोकडे कपडे चालणार नाहीत !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  –    मंदिरात प्रवेश करताना कपडे कोमट परिधान करावे याबाबत अणे कामंदीमध्ये नियमावली केली आहे. त्यावरून अनेक वादनगही उठले होते. मात्र, शिर्डीतील साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना साईबाबा संस्थांनने एक विनंतीवजा सूचना केली आहे. त्यामध्ये त्यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करून यावे म्हंटले आहे.

दरम्यान संस्थानचा कारभार सध्या तदर्थ समितीमार्फत पाहिला जात असून संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेऊन सूचना फलक लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या पोषाखाची सक्ती केली नसली तरी यावर दोन्ही बांजूनी चर्चा होत आहे.

लॉकडाऊननंतर नुकतेच मंदिरे खुली करण्यात आली आहेत. शिर्डीत भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. मंदिर परिसरात संस्थानने काही सूचना फलक लावले आहे त्यामध्ये असे म्हंटले आह की, ‘साईभक्तांना विनंती आहे की, आपण पवित्र स्थळी प्रवेश करीत असल्याने कृपया भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा परिधान करावी. हे फलक इंग्रजी, हिंदी आणि मराठी या भाषेमध्ये लावण्यात आले आहे.

शिर्डीत दूरवरून भाविक येतात. अनेक जण पर्यटनाला यावे, तसे तोकड्या कपड्यांमध्ये येतात. त्याच कपड्यांमध्ये ते दर्शनालाही जातात. ही गोष्ट खटकत असल्याने काही भाविकांची इतर देवस्थानांप्रमाणेच शिर्डीतही कपड्यासंबंधी निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. दरम्यान, देशातील काही मंदिरांमध्ये असे निर्णय पूर्वीच घेण्यात आले. त्यातील काही ठिकाणी ते वादग्रस्तही ठरले होते. आता शिर्डी संस्थानने भाविकांना अशी सूचना दिली आहे. मात्र, याची अंमलबजावणी संस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेकडून कशी केली जाते, हेही लवकरच कळेल. सक्ती झाली तर इतर ठिकाणी जसा विरोध झाला तसा या ठिकाणी विरोध होण्याची शक्यता आहे.

पुन्हा मांदियाळी भरली

लॉकडाऊननंतर मंदिरे खुली केल्यामुळे भाविकांनी देवदर्शनासाठी गर्दी केलेली दिसत आहे. शिर्डीत आतापर्यंत लाखावर भाविकांनी दर्शन घेतले आहे. साईप्रसादही पुन्हा सुरू करण्यात आला असून त्याचा लाखो भाविकांनी लाभ घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीव नियमांचे पालन करूनच दर्शन सुरू आहे. ऑनलाईन बुकींग निश्चित करुनच शिर्डी येथे दर्शनाकरीता यावे. तसेच पालखी मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी पदयात्रींसह पालखी घेऊन शिर्डी येथे येण्‍याचे टाळावे, असे आवाहन साईभक्‍तांना साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने वारंवार करण्‍यात येत आहे.

You might also like