शिरूर : रस्त्यावर भाजीविक्री, खाद्यपदार्थ विक्रीवर आज पासून बंदी ! नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर होणार कारवाई

शिक्रापुर : प्रतिनिधी –   शिरूर तालुक्यात वाढता कोरोनाचा पादुर्भाव लक्षात घेता शिरूर शहरासह शिरूर तालुक्यातील काही गावात आठवडे बाजार बंद, रस्त्यावरील भाजी विक्री बंद ,जागेवर चहा , खाद्यपदार्थाचे गाडी,हॉटेल यांना बंदी असून फक्त घरपोच पार्सल सेवा देता येणार,तर दुचाकीवर फक्त एकच व्यक्ती प्रवास करणार असे नव्याने आदेश उपविभागीय अधिकारी यांच्या द्वारे लागू करण्यात आले असून, हे आदेश 23 ऑगस्ट ते पुढील आदेश येईपर्यंत असणार असल्याचे सांगून ,नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे,तर उल्लंघन करणाऱ्याचे आस्थापना बंद करण्यात येणार असल्याची माहिती शिरूरच्या तहसीलदार लैला शेख व शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली .हे आदेश शिरूर उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी 23 ऑगस्ट पासून ते पुढील निर्णय येईपर्यंत लागू असणार असल्याचे सांगितले आहे.

शिरूर तालुक्यातील कारेगाव, रांजणगाव गणपती ,शिक्रापूर, सणसवाडी ,तर्डोबाचिवाडी ,तळेगाव ढमढेरे ,धानोरे, डिंग्रजवाडी ,कोरेगाव भीमा ,शिरूर ग्रामीण व शिरूर नगरपालिका येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस इसमास त्यांच्या संपर्कात आल्याने होतो तसेच वरील गावांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग व पादुर्भाव यावर तात्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाय योजना आखणे आवश्यक झाले असल्याने या सर्व गावांमध्ये 23 ऑगस्ट 2020 पासून ते पुढील आदेश येईपर्यंत खालील प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत.असे आदेश उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख यांनी काढले आहेत.

शिरूर तालुक्यातील कारेगाव, रांजणगाव गणपती ,शिक्रापूर, सणसवाडी ,तर्डोबाचिवाडी ,तळेगाव ढमढेरे ,धानोरे, डिंग्रजवाडी ,कोरेगाव भीमा ,शिरूर ग्रामीण व शिरूर नगरपालिका या गावातील आठवडे बाजार पुणे पणे बंद राहतील .तसेच रस्त्यावरील भाजीविक्रेत्या प्रतिबंध करण्यात येत आहे. व्यापारी असता पण आणि ग्राहकांना सामाजिक आंतर ठेवण्याची सक्ती करावी तसेच ग्राहकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित ग्राहकाला रक्कम रुपये दोनशेपर्यंत दंड करण्यात येईल. दुकाने व्यापारी आस्थापना बँका यांनी नियमभंग केल्यास

पहिल्या नियमभंग रुपये 500 रुपये दंड,दुसऱ्या नियमभंग 1हजार रुपये व तिसऱ्या नियमभंग केल्यास 188 अंतर्गत फौजदारी कारवाई करून आस्थापना दुकाने बंद करण्यात येईल. तसेच जागेवर सेवा देणारे हॉटेल ,खाद्यपदार्थाचे गाडी, चहाची दुकाने बंद राहतील. या आस्थापनांना फक्त घरपोच सेवा देता येईल. दुचाकीवर दोन प्रवासी प्रवास करत असल्यास अशा प्रकरणात प्रतिवाहनास 200रुपये इतका दंड आकारण्यात येईल, ही कारवाई संबंधित नगरपरिषद व ग्रामपंचायतीने करावयाची आहे.तसेच या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतीने,नगरपरिषदेने पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने पथक तयार करावे. सदर आदेशाची जाहीर दवंडी द्यावी, प्रत्येक दिवशी केलेल्या कारवाईचा अहवाल ग्रामपंचायत नगरपरिषद यांनी तहसीलदार शिरूर यांच्याकडे द्यावा असा आदेश शिरूर उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी देऊन 23 ऑगस्ट पासून नवीन नियमावली सुरू करण्यात आली असल्याची माहिती शिरूरच्या तहसीलदार लैला शेख व शिरूर नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले आहे.