आमचा आवाज दाबण्यासाठी राज्यसभेत शिवसेनेच्या खासदारांची जागा बदलली : संजय राऊत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यसभेत शिवसेनेच्या खासदारांची बसण्याची जागा बदलण्यात आली आहे. आता शिवसेनेचे खासदार हे तिसऱ्या रांगेत न बसता पाचव्या रांगेत बसतील. यावर नाराज होऊन खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकैय्या नायडू यांना एक पत्र लिहिले आहे. ज्यात ते म्हणतात, मला हे समजल्यावर धक्का बसला की आमची आसनव्यवस्था बदलण्यात आलेली आहे. कोणीतरी मुद्दामून शिवसेनेला त्रास देण्यासाठी आणि आमचा आवाज दाबण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला.

संजय राऊत म्हणाले की मला याबाबतचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही कारण अद्याप आम्ही एनडीएतून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच आम्हाला 1/2/3 या ओळीतील सीट्स देण्यात यावेत अशी मागणी राऊत यांनी केली.

काही दिवसांपूर्वीच संजय राऊत आणि इतर शिवसेनेच्या खासदारांची जागा बदल्याचे वृत्त आले होते. तसेच यावेळी संजय राऊत हे देखील म्हणाले की, जुन्या एनडीएमध्ये आणि आजच्या एनडीएमध्ये खूप फरक आहे. जुन्या एनडीएतील महत्वाचे सदस्य असलेले आडवाणी सध्या सक्रिय नाहीत त्यामुळे आज एनडीएचे संजोजक कोण आहेत ? असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला.

Visit :  Policenama.com