राज्यपालांवर सेनेकडून ‘टीकास्त्र’, भाजपवर सुद्धा साधला ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यपाल हा राज्याचा नामधारी प्रमुख असतो. अनेक विधायक कार्ये राज्यपाल राजभवनातून करत असतात. राष्ट्रपती हा रबरी शिक्का व शोभेचे पद असे म्हणणे हे फार पूर्वीपासून चालत अलेलले आहे. सरकार एखादी चूक करत असेल तर, समज देण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. ज्यांना देशातील अनेक राज्यात जनतेने निवडून दिले आहे ते सुद्धा जनतेच्या डोळ्यात अंजन घालून जनतेला फसवित आहेत असा, टोला सेनेने भाजपला मारला आहे. राजभवन हे फक्त गोल्फ खेळण्याचे ठिकाण आहे आणि राजभवन कसे काम करते हे फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीला मध्यरात्री जागे झालेल्या राजभवनामुळे कळून येतेच, असा चिमटा सेनेने काढला आहे. भाजपशासित राज्यात राज्यपालांना चांगले काम असते.

सामना अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे –
१. राजभवन म्हणजे दारू ढोसण्याची जागा आहे असे विधान गोवा राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले आहे. राज्यपाल पदावरील व्यक्तीने हा खुलासा करणे म्हणजे फार आहे, याबाबत सरकारने त्यांना कोणत्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात यावे याचा विचार केला पाहजे. आपल्या देशांत राज्यपालांवर अनेकदा चर्चा झाली असून,राजभवन म्हणजे शोभेसाठी असून ते फक्त जनतेच्या पैशांवर जगते असे सुद्धा म्हंटले जाते.

२. राज्यपाल हा केंद्र आणि राज्य यांच्यातील महत्वाचा दुवा असतो असे मानले जाते. राज्यपाल हे पद घटनात्मक पद असून, तो त्या त्या राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. गोव्याच्या राज्यपालांनी केलेले विधान हे राजभवनाची प्रतिष्ठा कलंकित करणारे असून, त्यांनी राज्यपालांना काहीही कामे नसतात तर, काश्मीरमधील राज्यपाल फक्त गोल्फ आणि दारू पिऊन आरामात राहतात असे गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हण्टले आहे.

३. आधीच्या काळात ही जागा ‘ जर्जर ‘नेत्यांची सोया करण्यासाठी होती तर, मोदी सरकारच्या काळात अनेक संघ प्रचारक राजभवनावर पाठवले जात असून, ते साधा मांसाहारही करत नाहीत. राजभवन मद्यपींची जागा आहे असे म्हणणे या कारणामुळे चुकीचे आहे. अनेकदा निवृत्त नोकरशहा, लष्करी अधिकारी यांच्या वर्णी लावल्या जातात त्या काही वेळेस प्रशासकीय दृष्ट्या योग्य असते. राज्यपाल हे सरकारी पक्षाच्या बाजूने काम करतात तेव्हा, नक्कीच वाद निर्माण होतात.

४. गोवा हे पर्यटनाचे प्रमुख केंद्र असून, तेथील राजभवन देशातील प्रसिद्ध असे निसर्गरम्य ठिकाण आहे. तेथील राज्यपालांनी असे विधान करणे म्हणजे राजभवनातील शिस्त मोडण्यासारखे आहे. सत्यपाल मलिक यांनी राजभवनाच्या भिंतींना कान आणि तोंड देखील असतात हे दाखवून दिले आहे. राज्यपालांना काही काम नसेल तर, हे पांढरे हत्ती पोसण्याची गरज काय ?