महापौर निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची ‘आघाडी’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन राज्यात सत्तास्थपानेचा तिढा सुटताना दिसत असून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन राज्यात सत्तास्थापन करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महापौर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र आल्याचे पहायला मिळाले. महापौर निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केले. तर तीन नगरसेवक गैरहजर होते.

पिंपरी चिचंवड महापौर निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रावादीचे उमेदवार माई काटे यांना मतदान केले. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या माई काटे यांचा पराभव झाला असला तरी येत्या काळात शहरातील राजकीय समिकरणे बलणार असल्याची शक्यता आहे. महापौर निवडणुकीत भाजपच्या माई ढोरे यांनी राष्ट्रवादीच्या माई काटे यांचा 40 मतांनी पराभव केला. भाजपच्या माई ढोरे यांना 81 मते पडली तर माई काटे यांना 41 मते पडली. शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केल्याने राज्याबरोबरच पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्याचे पहायला मिळाले.
पक्षादेश असल्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केले. महापौर निवडणुकीमध्ये भाजपचा विजय निश्चीत होता. मात्र, काल रात्री उशीरा निवडणुकीसंदर्भात पक्षादेश आला. त्यानुसारच सभागृहात उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी राष्ट्रावादीच्या उमेदवाराला मतदान केले असल्याचे शिवसेनेचे गटनते राहुल कलाटे यांनी सांगितले.

पुणे महापालिकेत आघाडीच्या उमेदवारांना शिवसेनेचे मतदान
पुणे महापालिकेच्या मुख्य सभागृहात झालेल्या निवडणुकीत महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश कदम आणि उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या नगरसेविका चांदबी नदाफ या दोघांच्या बाजूने शिवसेनेच्या नगरसेवकांनी मतदान केले. सत्तास्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले. यांची महाविकास आघाडी झाली असून हीच आघाडी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पहायला मिळाली.

Visit : Policenama.com