काय सांगता ! होय, ‘इथं’ देखील भाजप Vs शिवसेना, सख्खे भाऊ एकमेकांविरूध्द लढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  राज्यात भाजप शिवसेनेची जरी युती झाली असली तरी काही विधानसभा मतदारसंघात ते आमनेसामने आले आहेत. कणकवलीनंतर साताऱ्याच्या माण खटाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने भाजप विरोधी उमेदवार दिला आहे. काँग्रेसमधून पक्षांतर केलेल्या जयकुमार गोरे यांना भाजपने तिकीट दिलं असून त्यांच्या विरोधात शिवसेनेनं शेखर गोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दोघे सख्खे भाऊ एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर विद्यमान आमदार जयकुमार हे कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना सहकार्य केले. जयकुमार गोरे हे भाजपमध्ये येण्यापूर्वी त्यांचे बंधू शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या दोघांनीही पक्षाने दिलेल्या एबीफॉर्मद्वारे उमेदवारी अर्ज भरला आहे.

माण खटाव विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. माण मतदारसंघात आमचं ठरलंय कडून अनिल देसाई , माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी राष्ट्रवादीकडून , शेखर गोरे यांनी शिवसेनेकडून तर जयकुमार गोरे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Visit : Policenama.com