पुणे : शिवशाही दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, चालकासह 34 जण जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्वारगेट ते सांगली प्रवाशी घेऊन जाणाऱ्या शिवशाही बसला शिंदेवाडी येथील 50 फूट दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन चिमुकल्यांसहा चालक मिळून 34 प्रवासी जखमी झाले आहेत. बस दरीत कोसळल्यानंतर तिने 2 ते 3 वेळा पलटी झाली. यात 5 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आप्पासाहेब भाऊसाहेब देसाई (वय ७५, रा. बारामती) आणि एका ३० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जगन्नाथ मारुती साळुंके (वय 28 रा. दिग्रज, ता.मिरज जि. सांगली) असे अपघातात मयत झालेल्या दुसऱ्याचे नाव आहे.

तर, चालक अमित अभिनंदन चौगुले (वय 28) तसेच अभिदीप नंदकुमार धेंडे (वय 32), प्रियंका अभय बुद्रुक (24), सुधीर लक्ष्मणराव धोंडे (50), रवींद्र मोहन हातपाके (26), प्रज्ञा प्रदीप माने (26), प्राची वर्धमान निलाखे (22), केदार सुभाष यादव (24), राहुल आदगोंडा पाटील (32), रोहित उत्तम भगत (24), बाळासाहेब कृष्णा गायकवाड (63), सुजित संजय बनसोडे (31), तेजल विवेक सूर्यवंशी (20), वीरभद्र रंगराव सुतार (78), स्वाती उमेश कांबळे (30), उर्मिला शिरीष पवार (30), स्मिता यशवंत जोशी (64), चंद्रशेखर प्रभाकर नरगुंदे (66), सुमेत शशिकांत हाबळे (19), राजेश विनायक बनसोडे, विवेक शामराव चव्हाण, अश्विनी एकनाथ वरेकर (55), नंदीनी चंद्रशेखर नरगुंदे (61), हिंदुराव तुकाराम देवकर (66), आनंदी अनिकेत जोशी (04), स्वानंदी अनिकेत जोशी (1), मारुती भिवा बरमाटे (30), अरुण कृष्णाजी जोशी (50), सुमेत शशिकांत आंबळे (32), अरुण बळवंत पाटील, शिवानी रवी तोडकर (21), अश्विनी शिवाजी खांबे (30), अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक अमित चौगुले हे त्यांची शिवशाही बस घेऊन सकाळी साडे आकरा वाजण्याच्या सुमारास सांगलीला जात होते. बसमध्ये 30 ते 35 प्रवाशी होते. त्यावेळी कात्रजनंतर शिंदेवाडी जवळ आल्यानंतर वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट 50 फूट दरीत कोसळली आहे. खोल दारी असल्याने बस 2 ते 3 पालटली गेल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना जबर मार लागला. तर बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात 6 प्रवासी आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील दोघांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान अग्निशमन दल येण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. इतर प्रवासी जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात नेण्याचे काम सुरू आहे. याठिकाणी राजगड पोलीस, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे बिट मार्शल आणि अग्निशमन दल दाखल झाले आहे.

Visit : Policenama.com