शिवशाही बसचा अपघात ; कंडक्टर ठार, १९ जखमी

 कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

शिवशाही बसच्या अपघातांची मालिका सुरूच आहे.एसटी महामंडळात वर्षभरात दाखल झालेली वातानुकूलित शिवशाही बस त्याच्या सुविधांपेक्षा अपघातांनीच जास्त चर्चेत आहे. पुणे-बेंगळुरू महामार्गावर किणी टोल नाका येथे शिवशाही बसला अपघात झाला आहे. या अपघातात बसचा कंडक्टर ठार झाला असून १९ प्रवासी जखमी आहेत. शुक्रवारी पहाटे हा अपघात घडला. सागर सुधाकर परब ( वय ३०, रा. कलेली, ता. कुडाळ) असे मृत्युमुखी पडलेल्या कंडक्टरचे नाव आहे. जखमींमध्ये कुडाळ आणि पुणे येथील प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’282a18f0-c870-11e8-aa5a-6f09ebf9d8cf’]

शिवशाही बस पुण्याच्या निगडीहून सावंतवाडीला जात होती. शिवशाही बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली.या अपघातात बसच्या एका बाजुचा चुराडा झाला. तर ट्रक धडकेनंतर  बाजुच्या खडयात पलटी झाला.
हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या केबिनचा चुराडा झाला आहे. या अपघातामध्ये बसचा कंडक्टर जागीच ठार झाला तर ड्रायव्हरसह १९ प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर येण्याचा मार्ग नसल्याने शेवटी बसच्या काचा फोडून इतर प्रवासी आणि जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

पिंपरी विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या हालचाली


शिवशाहीचा प्रवास  बनला असुरक्षित –
गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या एसटीतील भाडेतत्त्वावरील  शिवशाही बसच्या अपघात सत्र वाढलेले असून २३० पेक्षा अधिक अपघात झाल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. यामध्ये १९ प्राणांतिक अपघात असून १९० हे गंभीर अपघात, तर २१ किरकोळ अपघात असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामुळे शिवशाही बसने प्रवास करणे प्रवाशांना असुरक्षित वाटू लागले आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4fd7b884-c870-11e8-9d9d-3b805f4aa86e’]